मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी

पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. (MP Chhatrapati Sambhaji Raje to lead Maratha Reservation Issue)

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी

नवी दिल्ली : “मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे,” अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. (MP Rahul Shewale demand MP Chhatrapati Sambhaji Raje to lead Maratha Reservation Issue)

राहुल शेवाळे यांनी नुकतंच संभाजीराजे दिल्लीत सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी निवेदन देताना त्यांनी ही मागणी केली. तसेच या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

“महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.”

या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून, या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी मागणी केली. तसेच याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष द्यावे. तसेच पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली.

छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान नुकतंच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. “लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी” असे संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले आहे. (MP Rahul Shewale demand MP Chhatrapati Sambhaji Raje to lead Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *