बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण, सर्च ऑपरेशन सुरु

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथून लष्कराच्या एका जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. हा जवान बडगाम जिल्ह्यातील काझिपुरा चादुरा या क्षेत्रातून बेपत्ता आहे. अपहरण झालेल्या जवानाचे नाव मोहोम्मद यासीन आहे. मोहोम्मद यासीन हे सुट्ट्यांवर घरी आले होते. ते 26 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत सुट्टीवर होते. याच दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळून त्यांचं अपहरण करण्यात आलं. ते भारतीय लष्कराच्या जम्मू […]

बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण, सर्च ऑपरेशन सुरु
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथून लष्कराच्या एका जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. हा जवान बडगाम जिल्ह्यातील काझिपुरा चादुरा या क्षेत्रातून बेपत्ता आहे. अपहरण झालेल्या जवानाचे नाव मोहोम्मद यासीन आहे. मोहोम्मद यासीन हे सुट्ट्यांवर घरी आले होते. ते 26 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत सुट्टीवर होते. याच दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळून त्यांचं अपहरण करण्यात आलं. ते भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर लाईट इंफ्रंट्री युनिटचे जवान होते.


जवानाच्या अपहरणानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या शोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. या विशेष ऑपरेशनअंतर्गत या परिसराला घेराव घालण्यात आला आहे. जवान मोहोम्मद यासीन यांना त्यांच्या घराजवळील जंगलाच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती यासीन यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

आज सायंकाळी उशीरा पोलिसांना एका जवानाचे त्याच्या राहत्या घरुन अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आणि भारतीय लष्कराने एका संयुक्त पथकाला घटनास्थळी पाठवले. तसेच, काझिपुरा, चादुरा आणि शेजारील पुलवामा परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वीही जम्मू-काश्मीर येथून जवानांच्या अपहरण आणि हत्यांच्या घटना घडल्या आहेत. मे, 2017 साली लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अखनूर येथून एका जवानाचे अपहरण केले होते. एका लग्न संभारंभातून त्या जवानाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या जवानाची निघृणपणे हत्या करण्यात आली होती.