Corona : चीनी मोबाईल कंपनीकडून केंद्र सरकारला एक कोटींची मदत

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Oppo give one crore to pm relief fund) आहे.

Corona : चीनी मोबाईल कंपनीकडून केंद्र सरकारला एक कोटींची मदत
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 9:14 AM

मंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Oppo give one crore to pm relief fund) आहे. सध्या भारतात एक हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आतापर्यंत अनेक दिग्गजांनी, बड्या उद्योजकांनी आणि कंपन्यांनी केंद्र सरकारला आर्थिक मदत केली आहे. चीनची मोबाईल निर्माती कंपनी ओप्पोनेही (OPPO) भारताला एक कोटींची मदत (Oppo give one crore to pm relief fund) केली आहे.

“कोरोनाविरोधात सर्वात पुढे होऊन लढणाऱ्यांचं हित निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी आभार व्यक्त करावे म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. कोणतीही अडचण किंवा प्रश्न असल्यास ओप्पो कस्टमर केअर चोवीस तास मदत करेल, व्हॉट्सअप, सोशल मीडिया अकाऊंट किंवा ई-मेलद्वारे मदत केली जाईल”, असं कंपनीने म्हटले आहे.

“आम्ही देशातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि कठीण काळात आम्हाला शक्य असल्यास मदतही करत राहणार. वाईट वेळ कायम नसते आणि आम्हाला विश्वास आहे आपण सर्व एकत्र येऊन हे संकट परतवून लावू”, असं ओप्पोने सांगितले.

सध्या कंपनीने सरकारने केलेल्या लॉकडाऊन दरम्यान आपले सर्व शॉप बंद केले आहेत. तसेच ओप्पो एमको एम 31 (OPPO Emco M31) स्मार्टफोनची लॉन्चिग संध्या थांबवण्यात आली आहे. तसेच कंपनीने आपल्या सर्व वस्तूंवरील वॉरंटी 31 मे 2020 पर्यंत वाढवली आहे.

“ओप्पो स्मार्टफोन कंपनीने एक ऑनलाईन रिपेअरिंग सर्व्हिसही सुरु केली आहे. या माध्यमातून तुमच्या फोनमधील सॉफ्टवेअर संबंधीत अडचणी दूर केल्या जातील. आम्ही एक ऑनलाईन रिपेअर सर्व्हिस सुरु करत आहे. यामाध्यमातून तुम्हाला बेसिक समस्या आणि सॉफ्टवेअर संबंधित समस्या दूर करण्यास मदत मिळेल”, असं ओप्पोने सांगितले.

देशातील सध्या टॉप मोबाईल निर्माता कंपन्यांच्या यादीत ओप्पोचा नंबर येतो. ओप्पो ही एक चीनमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल निर्माता कंपनी आहे. ओप्पोचे मेन ऑफिस चीनच्या ग्वांगडोंगमध्ये आहे.2019 मध्ये ओप्पो चीनमधील टॉपचा मोबाईल ब्रँड होता. तर जगभरात पाचव्या क्रमांकावर होता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.