AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात, खासदारांच्या उपस्थितीत चारा छावणीवरच लग्न

उस्मानाबाद : कोणी आकाशात, तर कोणी पाण्यात विवाह केल्याचे अनेक उदाहरणे आपण आजवर ऐकली असतील. मात्र मुक्या जनावरांसह मान्यवरांच्या साक्षीने उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील आई चारा छावणीत शेतकरी कुटुंबातील दोन जोडप्यांचा एक वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. चारा छावणीतील या विवाह सोहळ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार मिळालाय. दुष्काळ हा माणसाच्या जीवावर उठलाय. याच दुष्काळाने घरादारातील मुलीची लग्न होत नसल्याने […]

गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात, खासदारांच्या उपस्थितीत चारा छावणीवरच लग्न
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 29, 2019 | 6:35 PM
Share

उस्मानाबाद : कोणी आकाशात, तर कोणी पाण्यात विवाह केल्याचे अनेक उदाहरणे आपण आजवर ऐकली असतील. मात्र मुक्या जनावरांसह मान्यवरांच्या साक्षीने उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील आई चारा छावणीत शेतकरी कुटुंबातील दोन जोडप्यांचा एक वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. चारा छावणीतील या विवाह सोहळ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार मिळालाय.

दुष्काळ हा माणसाच्या जीवावर उठलाय. याच दुष्काळाने घरादारातील मुलीची लग्न होत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास अवळत जीवनयात्रा संपवत असल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तेरमधील आई संस्था आणि श्रद्धा चारा छावणी पुढे सरसावली. दुष्काळात गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी चक्क चारा छावणीवरच उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मुलीचा विवाह लावून दिला. दुष्काळाच्या भीषण स्तिथीत डोळ्याला आणि मनाला आनंद देणाऱ्या चारा छावणीवरील विवाह सोहळा पार पडला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील निकिता बाळू देडे आणि कळंब येथील गणेश लहू गवळी यांचा, तर भंडारवाडी येथील सोनाली जोतीराम एडके आणि तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील ज्ञानेश्वर देवकर या दोन जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त दुष्काळ, माळरानावरील जनावरांच्या चारा छावणीत लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळीच्या स्वागतासाठी लागलेल्या कमान पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सतीश सोमाणी यांनी जनावरांसाठी चारा छावणी सुरु केली. यात आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी जनावरे आणली. मात्र काही शेतकरी आपल्या मुलींची लग्न पैसे नसल्याने पुढे ढकलत असल्याचं लक्षात येताच चारा छावणीवर लग्नाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात राबविली.

या लग्नासाठी बँड बाजा, जेवण, नवरा-नवरीची नटापटा, वऱ्हाडी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी ही याच छावणीवर करण्यात आली होती. हे लग्न इतर लग्नाप्रमाणेच होत असल्याने नवरा-नवरीही आनंदी झाले. या लग्नासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आणि अनिल काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांच्यासह तहसीलदार विजय राऊत आणि अन्य मंडळींनी आवर्जून हजारी लावल्याने हा सोहळा वधूवरांसाठी विशेष ठरला.

दुष्काळमध्ये केवळ चारा छावणी चालवणे उदिष्ट नसून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने शेतकरी जगला पाहिजे हाच उदिष्ट ठेवून आम्ही हा विवाह सोहळा आयोजित केला असून या पुढे ही आम्ही हा उपक्रम कायम ठेवणार असल्याचे छावणी चालक सतीश सोमाणी यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्यात दुष्काळचे भीषण संकट आहे. या संकटाला शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाला तोंड दिले पाहिजे शासन त्यांच्यासोबत आहे. चारा छावणीवरील विवाह एक आगळा वेगळा उपक्रम असून असे उपक्रम जिल्यात इतर ठिकाणी राबविणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडले.

दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत असताना आई संस्थेने चारा छावणीवरील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दिलेला मायेचे आशीर्वाद नवी प्रेरणा देणारा आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा