Pakistan Train Accident | पाकमध्ये ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक, 19 शीख भाविकांचा मृत्यू

| Updated on: Jul 03, 2020 | 6:26 PM

पाकच्या शेखपुरा भागात ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात 19 शीख भक्तांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan Train Accident | पाकमध्ये ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक, 19 शीख भाविकांचा मृत्यू
Follow us on

शेखुपुरा : पाकिस्तानात एक मोठी दुर्घटना (Pakistan Sheikhupura Train And Mini Bus Accident) घडली आहे. पाकच्या शेखुपुरा भागात ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू झाला आहे. वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 8 शीख भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात ननकाना साहिबजवळील (Nankana Sahib) फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाला (Pakistan Sheikhupura Train And Mini Bus Accident).

रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कार्य सुरु आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅसेन्जर ट्रेनने या बसला धडक दिली. या बसमध्ये जास्तकरुन भाविक होते, जे ननकाना साहिबवरुन परतत होते.

पाकिस्‍तानच्या डॉन न्यूज टीव्हीनुसार, पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

ही घटना शेखुपुराच्या फरुकाबाद येथील आहे. कराची येथून लाहोर जाणाऱ्या शाह हुसैन एक्सप्रेस पॅसेन्जर ट्रेन आणि एका मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली, अशी माहिती पाकिस्‍तानच्या पंजाबमधील शेखुपुरा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी गाजी सलाहुद्दीन यांनी सांगितलं (Pakistan Sheikhupura Train And Mini Bus Accident).

संबंधित बातम्या :

UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ

Pakistan-China | लादेनला ‘शहीद’ म्हणणारे इम्रान खान पाकला दहशतवाद पीडित समजतात

Karachi Terror Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, स्टॉक एक्सेंजमध्ये अंधाधुंद गोळीबार