मंदीत संधी, पार्लेची चांदी, लॉकडाऊनमध्ये पार्ले बिस्कीटची विक्रमी विक्री, 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

| Updated on: Jun 09, 2020 | 4:25 PM

लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटांची विक्रमी विक्री झाली आहे. पार्लेनी गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

मंदीत संधी, पार्लेची चांदी, लॉकडाऊनमध्ये पार्ले बिस्कीटची विक्रमी विक्री, 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात (Parle-G Biscuit Sale During Lockdown) लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. मात्र, लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटांची विक्रमी विक्री झाली आहे. पार्लेने गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडित (Parle-G Biscuit Sale During Lockdown) काढला आहे.

फक्त 5 रुपयांमध्ये मिळणाऱ्या पार्ले-जीचा बिस्किट पुडा शेकडो किलोमीटर पायी गाव गाठणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरला. पार्ले बिस्किट कोणी स्वत: घेतले तर कुणी इतरांना मदत म्हणून वाटले.

82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

पार्ले-जी कंपनी 1938 पासून अनेकांचा आवडता बिस्किट ब्रॅण्ड आहे. लॉकडाऊन दरम्यान, पार्लेने आतापर्यंतच्या सर्वाधिक बिस्किट पुडे विकण्याचा विक्रम केला आहे. पार्लेने किती बिस्किटांचे पुडे विकले गेले याबाबत अधिकृत आकडे दिलेले नाहीत. मात्र, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात गेल्या 8 दशकातील सर्वाधिक विक्री झाली, असं कंपनीने म्हटलं आहे.

पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह यांनी सांगितलं की, कंपनीचा एकूण मार्केट शेअर 5 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये 80-90 टक्के ग्रोथ पार्लेच्या विक्रीमुळे झाली (Parle-G Biscuit Sale During Lockdown) आहे.

पार्लेचा लॉकडाऊनमध्ये फायदा कसा झाला?

काही बिस्किट उत्पादन कंपन्यांनी जसे पार्लेने लॉकडाऊन सुरु झाल्याच्या काही काळानंतर उत्पादनाला सुरुवात केली होती. यामध्ये काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था केली होती. जेणेकरुन त्यांना कामावर येणं सोयीस्कर होईल. जेव्हा कारखाने सुरु झाले, तेव्हा या कंपन्यांचा उद्धेश त्या प्रोडक्ट्सचे उत्पादन करणे होते, जे जास्त विकलं जातात.

ब्रिटानियाच्या बिस्किटांचीही मोठी विक्री

पार्लेच नाही तर गेल्या तीन महिन्यांमध्ये लॉकडाऊनदरम्यान इतर कंपन्यांचेही बिस्किट मोठ्या प्रमाणात विकले गेले. ब्रिटानिया कंपनीचं गुड डे, टायगर, मिल्क बिक्सिट, बर्बन आणि मारी हे बिस्किटंही मोठ्या प्रमाणात विकले गेले.

लॉकडाऊनमध्ये पार्लेने अनेकांची भूक भागवली

पार्ले प्रोडक्ट्सने आपल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या आणि कमी किमतीच्या पार्ले-जी बिस्किटांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. कारण ग्राहकांकडून या बिस्किटांची मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. कंपनीने वितरकांना आठवडाभरात सज्ज केल्याने, किरकोळ विक्रेत्यांना बिस्किटांची कमतरता भासू दिली नाही.

लॉकडाउनदरम्यान, पार्ले-जीने अनेकांसाठी जेवणाची जागा घेतली. अनेकांची भूक भागवली. जे लोक जेवण विकत घेऊ शकत नव्हते, ते पार्ले-जी बिस्किट विकत घेऊ शकत होते, अशी माहिती मयांक शाह (Parle-G Biscuit Sale During Lockdown) यांनी दिली.

संबंधित बातम्या :

दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय

Railway Recruitment 2020 : 10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

कुणालाही नोकरीवरुन काढू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

OLA | तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी, उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ