मायराच्या अभिनयाला दाद, समीक्षकांकडून ‘पिहू’वर रेटिंगचा वर्षाव

मायराच्या अभिनयाला दाद, समीक्षकांकडून 'पिहू'वर रेटिंगचा वर्षाव


मुंबई : विनोद कापरी दिग्दर्शित मच अवेटेड पिहू सिनेमा आज देशभरात रिलीज होतोय. दोन वर्षांची चिमुकली मायरा विश्वकर्माच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातलीय. या थरारक सिनेमाच्या कथानकाने अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. स्पेशल स्क्रीनिंग पाहिल्यानंतर प्रत्येकाने हीच प्रतिक्रिया दिली. आता समीक्षकांनीही सिनेमावर रेटिंगचा वर्षाव केलाय.

घरात एकटी असलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत काय काय घडू शकतं याची झलक दाखवणारा ‘पिहू’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ट्रेलर आल्यापासून हा सिनेमा कधी रिलीज होतो याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र त्याआधी गोव्याच्या ‘इफ्फी’मध्ये आणि शुक्रवारी झालेल्या प्रेस स्क्रिनिंगमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय मुंबई आणि दिल्लीत झालेल्या स्पेशल स्क्रीनिंगनंतरही प्रेक्षकांनी या सिनेमाच्या कथानकाला आणि मायराच्या अभिनयाला दाद दिली.

प्रेक्षकांना सिनेमा आवडला आहेच, शिवाय समीक्षकांनीही या सिनेमाचं कथानक खिळवून ठेवणारं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय मायराचा अभिनय ही सिनेमातील जमेची बाजू असल्याचं सांगितलंय. दोन वर्षांच्या चिमुकलीकडून अभिनय करुन घेणं हेच दिग्दर्शकाचं खरं यश असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

कुणाकडून किती रेटिंग?

‘इंडियन एक्स्प्रेस’कडून दिग्दर्शकाच्या कामाला पावती देण्यात आली आहे. सिनेमाचं कथानक हेच सिनेमाचं यश आहे, असं यामध्ये म्हटलं आहे. शिवाय सिनेमाला पाचपैकी तब्बल चार गुण देण्यात आले आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’कडून या सिनेमाला पाचपैकी तीन गुण देण्यात आले आहेत. मायराचा अभिनय आणि कथानकाचं यामध्ये कौतुक करण्यात आलंय.

मायराचा अभिनय हा श्वास रोखून धरायला लावणारा असल्याचं न्यूज 18 च्या समीक्षकांनी म्हटलंय. न्यूज 18 ने पिहू सिनेमाला पाचपैकी तीन गुण दिले आहेत.

विनोद कापरी दिग्दर्शित हा सिनेमा मस्ट वॉच असल्याचं ‘द नॅशनल’च्या समीक्षकांनी म्हटलं आहे. शिवाय हा सिनेमा का पाहावा याचं उत्तरही त्यांनी आपल्या समीक्षणातून दिलंय.

पिहू सिनेमा पालकांना काहीतरी शिकवण देणारा असल्याचं मुंबई मिररच्या समीक्षकांनी म्हटलं आहे. पाचपैकी अडीच स्टार देत मायराचा अभिनय हा सिनेमाची जमेची बाजू असल्याचं समीक्षण यामध्ये करण्यात आलंय.

टाइम्स नाऊनेही पाचपैकी साडे तीन गुण देत या सिनेमाचं आणि कथानकाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शकाच्या कामालाही या समीक्षणातून पावती देण्यात आली आहे.

‘स्क्रोल’ने सिनेमाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक विनोद कापरी यांची आयडिया आणि त्यांनी निवडलेलं कथानक कसं मजबूत आहे, ते या समीक्षणातून सांगितलं आहे.

मराठी समीक्षकांकडूनही पिहू सिनेमावर रेटिंगचा वर्षाव करण्यात आलाय. लोकमतने या सिनेमाला पाचपैकी तीन गुण दिले आहेत. या सिनेमाचं कथानक आई-वडिलांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याचं समीक्षण लोकमतने केलं आहे.

एकट्या घरात जायबंदी झालेली पिहू अत्यंत धोकादायक प्रसंगांमधून जाते. ती सर्व दृष्य हृदयाचा ठोका चुकवणारी आहेत, असं म्हणत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पाचपैकी तीन गुण दिले आहेत. सिनेमाच्या कथानकासोबतच तांत्रिक बाबींही चांगल्या असल्याचं या समीक्षणात म्हटलं आहे.

VIDEO : सिनेमाचा ट्रेलर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI