पिंपरी चिंचवडमध्ये 56 ठिकाणी नाकाबंदी, तर 13 चेकनाके, कडकडीत लॉकडाऊनसाठी पोलीस सज्ज

पिंपरी चिंचवडमध्ये 56 ठिकाणी नाकाबंदी, तर 13 चेकनाके, कडकडीत लॉकडाऊनसाठी पोलीस सज्ज

पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे दहा दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी तर 13 ठिकाणी चेकनाके असणार आहेत (Pimpri Chinchwad police ready for Lockdown).

चेतन पाटील

|

Jul 13, 2020 | 6:07 PM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे (Pimpri Chinchwad police ready for Lockdown). हा लॉकडाऊन आज (13 जून) मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, या लॉकडाऊनसाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस सज्ज झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे दहा दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी तर 13 ठिकाणी चेकनाके असणार आहेत (Pimpri Chinchwad police ready for Lockdown).

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये 1 पोलीस आयुक्त, 1 अप्पर पोलीस आयुक्त, 3 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्याक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरातील विविध भागात तैनात करण्यात आला आहे.

नाकाबंदी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी 1 अधिकारी 3 कर्मचारी 2 ट्राफिक कर्मचारी असणार आहेत. तर चेकनाक्यावर 1 अधिकारी, 4 कर्मचारी 2 सशस्त्र पोलीस कर्मचारी असणार आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आज शहरातील विविध भागात फिरुन नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर पुढचे काही दिवस घरातच थांबावं लागेल, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जो नागरिक घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन करेल त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.

लॉकडाऊनदरम्यान काय सुरु काय बंद?

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. दरम्यान, 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाँजदेखील बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत (Pune Lockdown Guidelines declared by municipal commissioner Vikram Kumar).

पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पॉ, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.

14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. तर 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील.

मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर पुढचे पाच दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटन, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.

संबंधित बातमी : पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें