Pimpri Murder | पिंपरीत प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या, सहा जणांना अटक

पिंपरी चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून एका 20 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

Pimpri Murder | पिंपरीत प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या, सहा जणांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून एका 20 वर्षीय (Pimpri Murder Case) युवकाची हत्या झाल्याची घटना घडली. विराज जगताप असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) सहा जणांना अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यांच्याविरोधात विराज जगताप याच्या खुनाचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला (Pimpri Murder Case) आहे.

पिंपळे सौदागर भागात रविवारी (7 जून) रात्री हा प्रकार घडला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने 20 वर्षीय विराज जगतापला पिंपरी पुलावर गाठले. विराजच्या दुचाकीला आरोपींनी आपल्या वाहनांची धडक देऊन जखमी केले, त्यानंतर त्याला धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात विराज गंभीर जखमी झाला होता.

त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले (Pimpri Murder Case). मात्र, दुसऱ्या दिवशी विराज जगताप याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनतर विराज जगताप याच्या नातेवाईकांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज जगतापची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, हत्या झालेल्या विराज यांच्या कुटुंबीयांनी सहाही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांनी त्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचं सांगत त्यांनी ही मागणी केली आहे. विराज जगतापच्या खुनानंतर पिंपळे सौदागर भागात तणावाचे वातावरण आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत (Pimpri Murder Case).

संबंधित बातम्या :

यूपीत गरोदर सवतेची गोळी मारुन हत्या, आरोपी महिलेला बेड्या

मुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, हत्येच्या पाच दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता मृतदेहच रुग्णालयातून गायब

एकाच कुटुंबातील चौघांच्या खात्यातून साडेसात लाख लंपास, नागपुरात सायबर चोरांमुळे डोकेदुखी

नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं

Published On - 5:12 pm, Tue, 9 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI