AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच कुटुंबातील चौघांच्या खात्यातून साडेसात लाख लंपास, नागपुरात सायबर चोरांमुळे डोकेदुखी

कर्जावर घेतलेल्या तुझ्या लॅपटॉपचा हफ्ता शिल्लक आहे. तो तातडीने भर नाही तर भरमसाठ व्याज आकारलं जाईल, असे सांगून भीती निर्माण करण्यात आली.

एकाच कुटुंबातील चौघांच्या खात्यातून साडेसात लाख लंपास, नागपुरात सायबर चोरांमुळे डोकेदुखी
| Updated on: Jun 08, 2020 | 3:53 PM
Share

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या आर्थिक (Cyber Crime In Nagpur) अडचणींमध्ये आधीच वाढ झालेली असताना सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. नागपुरात अशाच एका प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेलही (Cyber Crime In Nagpur) चक्रावून गेले आहे.

नागपूरच्या वर्मा लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील तरुण मुलाला फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी फोन केले. कर्जावर घेतलेल्या तुझ्या लॅपटॉपचा हफ्ता शिल्लक आहे. तो तातडीने भर नाही तर भरमसाठ व्याज आकारलं जाईल, असे सांगून भीती निर्माण करण्यात आली. हे ऐकून संबंधित तरुण घाबरला, त्याने त्याच्या निवृत्त वडिलांच्या डेबिट कार्डचे डिटेल त्या भामट्याला दिले. एवढेच नाही तर, सायबर गुन्हेगारांनी भीती दाखवताच त्याने वडिलांच्या बँक खात्याशी जोडलेला त्यांचा कस्टमर इन्फर्मेशन नंबर (CIF) सुद्धा सायबर गुन्हेगारांना दिला.

दुर्दैवाने या कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक खाते आपापसात जोडलेले होते. सायबर गुन्हेगारांनी वडिलांच्या बँक खात्यातून 5 लाख, तर आईच्या बँक खात्यातून 2 लाख तसेच पीडित तरुण आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यातून आणखी 50 हजार असे साडे 7 लाख रुपये काही मिनिटातच लंपास केले. पीडित कुटुंबाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदविली असून त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात (Cyber Crime In Nagpur) आला आहे.

मात्र, ज्या पद्धतीने एका खात्यातील महत्त्वाची माहिती घेऊन सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केले आहे. ही या प्रकारची पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेले आहे. लोकांनी कुटुंबातील सदस्यांचे बँक खाते एकमेकांशी जोडलेले असले, तरी त्याच्यातून रक्कम काढली जात असताना दोघांच्या संमतीशिवाय ती रक्कम काढली जाऊ नये, अशी सोय बँकेकडून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात सायबर गुन्हेगार बिहारमधून बोलत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस गुन्हेगारांच्या मागावर आहेत. मात्र, या घटनेननंतर लोकांनी खासकरुन सेवानिवृत्त लोकांनी खूप सावध राहण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Cyber Crime In Nagpur

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं

पैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं, थेट मशिनच फोडलं, तरुणाला जेल

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे गुन्हेगारांचा उच्छाद, नागपुरात 24 तासात 3 खून

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.