पैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं, थेट मशिनच फोडलं, तरुणाला जेल

मुंबईत एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकलं म्हणून एका तरुणाने थेट मशिनच फोडलं. मुंबईतील कांदीवली पूर्व लोखंडवाला सर्कलजवळ ही घटना घडली.

पैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं, थेट मशिनच फोडलं, तरुणाला जेल

मुंबई : मुंबईत एटीएम मशिनमध्ये कार्ड अडकलं (Man Broke ATM Machine) म्हणून एका तरुणाने थेट मशिनच फोडलं. मुंबईतील कांदिवली पूर्व लोखंडवाला सर्कलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली (Man Broke ATM Machine) आहे.

मालाड पश्चिम येथे राहणारा 26 वर्षीय संजय कुमार बुधवारी रात्री साडे 12 च्या सुमारास लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेंट्रिअम मॉलमधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. संजय कुमारने अनेकदा एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाही. त्यानंतर त्याचं एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकलं.

अनेकदा प्रयत्न करुनही पैसे न निघाल्याने संजय कुमार संतापला होता. त्यात एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकल्याने त्याचा पारा चढला आणि त्याने थेट मशिनच फोडलं (Man Broke ATM Machine).

या घटनेची माहिती मिळताच समता नगप पोलिसांनी घटनास्थळ गाठत संजय कुमारला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले.

गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. संजय कुमारच्या घरी पैसे नव्हते. त्यामुळे तो एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. मात्र, प्रयत्न करुनही पैसे न निघाल्याने त्याने थेट एटीएम फोडलं, अशी माहिती (Man Broke ATM Machine) पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे गुन्हेगारांचा उच्छाद, नागपुरात 24 तासात 3 खून

पोलीस ठाण्यातच धारदार शस्त्राने हत्या, साताऱ्यातील थरारक घटना

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *