नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

नवी मुंबईत एका बिल्डरची पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत एका बिल्डरची पूर्ववैमनस्यातून (Navi Mumbai Builder Murder) दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. डोक्यात गोळी मारल्याने या बिल्डरचा जागीच मृत्यू झाला. तळवळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्रवीण तायडे असे हत्या झालेल्या (Navi Mumbai Builder Murder) बिल्डरचं नाव आहे.

घणसोली सेक्टर 21 (तळवली) येथे बांधकाम भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्याच्या वादातून गुरुवारी (4 जून) संधी साधून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर जुन्या काही गुन्हेगारी प्रकरणात तो साक्षीदार असल्याचीही माहिती आहे. यामुळे जुन्या कोणत्या वादातून त्याची हत्या झाली आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

भरदुपारी प्रवीण तायडे आणि साथीदारावर हल्ला

गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत मोटारसायकलवरुन जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक मारली. त्यानंतर मारेकरुंपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या (Navi Mumbai Builder Murder).

त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. सध्या जखमी साथीदारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तपास पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तायडेच्या संपर्कातील व्यक्तींकडे पोलीस चौकशी करत आहेत (Navi Mumbai Builder Murder).

संबंधित बातम्या :

एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे गुन्हेगारांचा उच्छाद, नागपुरात 24 तासात 3 खून

नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या, तीन संशयित ताब्यात

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *