गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

शहापूर तालुक्यात आटगावमध्ये 28 वर्षीय सिद्धेश प्रकाश जंगम याचा गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसल्याने मृत्यू झाला. (Shahapur Son Suspicious Death in Father Birthday Party)

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

शहापूर : शहापूरमध्ये गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. वडिलांची बर्थडे पार्टी सुरु असतानाच हा प्रकार घडला. ही हत्या आहे की आत्महत्या याविषयी संशय निर्माण झाला आहे. (Shahapur Son Suspicious Death in Father Birthday Party)

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आटगावमध्ये हा प्रकार घडला. 28 वर्षीय सिद्धेश प्रकाश जंगम याचा गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसल्याने मृत्यू झाला. वडील प्रकाश रामचंद्र जंगम यांच्या वाढदिवसाची पार्टी सुरु असतानाच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

आटगावातील आगरीपाडा भागात अतुल्य शुभवास्तू येथे जंगम कुटुंब राहते. प्रकाश जंगम यांच्या वाढदिवसानिमित्त काही जण जमले होते. यावेळी मयत सिद्धेश जंगम याचा मित्र भरत शेरे आपल्याजवळ असलेले अनधिकृत गावठी पिस्तुल घेऊन आला.

हेही वाचा : कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

भरतने पिस्तुल सुरक्षित ठिकाणी न ठेवल्याने ते सिद्धेशच्या नजरेस पडले असावे. त्याने ते पिस्तुल बनावट असल्याचे समजून आपल्या डोक्यात गोळी झाडली, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. गावठी कट्टा वापरणारा भरत शेरे, शब्बीर कावळकर, संदेश मडके, अरमान नाचरे हे घटनेच्या वेळी सिद्धेशसोबत होते.

हा प्रकार अपघाताने घडला, सिद्धेशने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली, हे कोडे निर्माण झाले आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनशाम आढाव पुढील तपास करत आहेत.

(Shahapur Son Suspicious Death in Father Birthday Party)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *