कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

मुलगा दारु पिऊन आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून आईने खलबत्त्यात असलेला दगड त्याच्या डोक्यात घातल्याचा आरोप आहे. (Kolhapur Mother Kills Son)

कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

इचलकरंजी : मुलगा दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याच्या रागातून आईनेच त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची मध्ये महिलेने खलबत्याचा दगड डोक्यात घालून मुलाचा खून केला. (Kolhapur Mother Kills Son)

38 वर्षीय रविशंकर तेलसिंगे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी 55 वर्षीय आरोपी आई लक्ष्मी शंकर तेलसिंगे हिला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तेलसिंगे कुटुंब हे सहा वर्षांपासून कोरोची या परिसरात भाड्यावर खोली घेऊन राहत आहे. मयत रविशंकर यांचे लग्न झाले होते, मात्र काही वर्षांपूर्वी पत्नीने त्यांना सोडचिठ्ठी दिली. ते यंत्रमागावर कामाला होते. तर त्यांची आई ही घरी शिलाई मशीनवर गारमेंटची कामे करते.

हेही वाचा : रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या

रविशंकर नेहमी दारु पिऊन आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करत होता. वारंवार होत असलेल्या या त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री आईने घरातील खलबत्त्यात असलेला दगड त्याच्या डोक्यात घातल्याचा आरोप आहे.

नागरिकांनी पाहिले असता रविशंकरच्या हातातील दगड काढून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला प्राथमिक उपचार करुन कोल्हापूर सीपीआर नेले असता मात्र पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी आई लक्ष्मी शंकर तेलसिंगे हिला ताब्यात घेतले आहे. (Kolhapur Mother Kills Son)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *