दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, बीडमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लहान (Big Brother Killed Small Brother At Beed) भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, बीडमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

बीड : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लहान (Big Brother Killed Small Brother At Beed) भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. गजानन काळे असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात खूनाचे प्रमाण वाढेल असून आज जिल्ह्यात पाचवा खून झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यात राहणाऱ्या आरोपी गजानन हा आपला लहान भाऊ लक्ष्मण काळे याच्याकडे दारुसाठी पैशाची मागणी करत होता. मात्र लक्ष्मणकडे पैसे नसल्याने त्याने गजाननला पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरुन गजानने धारदार शस्त्राने लक्ष्मणच्या डोक्यात वार केले.

यामुळे लक्ष्मण हे रक्तबंबाळ झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीच्या आईने याबाबत दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप गजानन काळेला अटक करण्यात आलेली (Big Brother Killed Small Brother At Beed) नाही.

संबंधित बातम्या : 

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

दारु पिण्यावरुन वाद, वडिलांनी पोटच्या मुलाचा गळा आवळला, मृतदेह दोन दिवस घरातच

तीन महिन्यांच्या बाळाच्या हत्येची तक्रार, आईच निघाली खुनी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *