दारु पिण्यावरुन वाद, वडिलांनी पोटच्या मुलाचा गळा आवळला, मृतदेह दोन दिवस घरातच

हत्येनंतर दोन दिवस वडिलांनी मुलाचा मृतदेह घरातच ठेवला होता, मात्र दोन दिवसांनी दुर्गंधी पसरल्याने पोलिसांना माहिती मिळाली (Hingoli Father Killed Son)

दारु पिण्यावरुन वाद, वडिलांनी पोटच्या मुलाचा गळा आवळला, मृतदेह दोन दिवस घरातच

हिंगोली : जन्मदात्या बापाने मुलाची हत्या केल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये उघडकीस आला आहे. दारुवरुन झालेल्या वादातून वडिलांनी पोटच्या मुलाचा गळा आवळला. मुलाचा मृतदेह त्यांनी दोन दिवस घरातच ठेवला. (Hingoli Father Killed Son)

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील माऊली हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली. आरोपी वडील उत्तम चव्हाण आणि मुलगा उमेश हे दोघेच घरी होते. त्यावेळी दारु पिण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा गळा आवळला.

रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास चव्हाण कुटुंबाच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. याची माहिती त्यांनी कुणालाही दिली नाही. दोन दिवस त्यांनी मृतदेह घरातच ठेवला. दोन दिवसांनी दुर्गंधी पसरल्याने वसमत शहर पोलिसांना माहिती मिळाली.

हेही वाचा : नाग अंगावर सोडून पत्नीची थंड डोक्याने हत्या, वीस दिवसांनी गूढ उकललं

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मयत तरुणाची आई सुमन चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन आरोपी वडील उत्तम चव्हाण यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलिसात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Hingoli Father Killed Son)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *