पोलीस ठाण्यातच धारदार शस्त्राने हत्या, साताऱ्यातील थरारक घटना

पोलीस ठाण्यात आलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस ठाण्यातच धारदार शस्त्राने हत्या, साताऱ्यातील थरारक घटना

सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर (Murder In Satara Police Station Area) आज एक धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्यात आलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोन कुटुंबात वाद असल्याने हे दोघे पोलीस ठाण्यात तो मिटविण्यासाठी आले होते (Murder In Satara Police Station Area).

साताऱ्यातील सैदापूर येथे राहणारे सुरेश कांबळे आणि रामा दुबळे या दोन कुटुंबात दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

त्यानुसार, आज सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात रामा दुबळे आला. यादरम्यान, सकाळी 11 च्या सुमारास सुरेश कांबळे यांनी सोबत आणलेल्या शस्त्राने पोलीस ठाण्याच्या आवारातच रामा दुबळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला (Murder In Satara Police Station Area). यामध्ये रामा दुबळे जखमी झाले. त्यानंतर त्याच धारदार शस्त्राने रामा दुबळे यांनी सुरेश यांच्या डोक्यात वार केला.

हा सगळा प्रकार सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच घडल्याने पोलिसांची धावाधाव झाली. सुरेश कांबळे आणि रामा दुबळे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यानंतर तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, या राड्यात गंभीर जखमी झालेले सुरेश कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, रामा दुबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत (Murder In Satara Police Station Area).

संबंधित बातम्या :

Zoom APP वर व्हिडीओ चॅट करत असलेल्या वडिलांची मुलाकडून हत्या, वेगवेगळ्या चाकूने 15 वार

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *