AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात पाणी नेण्यासाठी फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पोच पळवला

टेम्पो चालकाचं अपहरण करून पाईपने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

शेतात पाणी नेण्यासाठी फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पोच पळवला
| Edited By: | Updated on: Jun 12, 2019 | 4:21 PM
Share

पुणे : दुष्काळ कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही. गावी दुष्काळ पडल्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. शेतात पाईपलाईन करायची म्हणून तिघांनी मिळून पाईपने भरलेला टेम्पो चोरून नेला. टेम्पो चालकाचं अपहरण करून पाईपने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

अमोल मोरे, समाधान दौंड आणि संदीप राजेंद्र मोरे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व आरोपी मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे त्यांना आर्थिक अडचण भासू लागली. त्यांना शेतात पाईपलाईन करायची आहे. यासाठी तिघांनी मिळून पाईपने भरलेला टेम्पो चोरण्याचे ठरवलं.

संदीप मोरे सध्या शेलपिंपळगाव येथे शिक्रापूर रोडवर राहतो. त्याच्या घरासमोर अनेक वाहने थांबतात. 6 जून रोजी तिघांनी मिळून फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पो हेरला. टेम्पोवर भास्कर श्रीपतराव लांडगे हे चालक होते. तिन्ही आरोपींनी रात्री पावणे बाराच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो अडवला. आम्ही फायनान्सचे लोक आहोत. तुमच्या गाडीचा हप्ता थकलेला आहे, असे सांगून दोघांनी भास्कर यांना त्यांच्या दुचाकीवर नेले. तिसऱ्या आरोपीने पाईपने भरलेला टेम्पो सरळ उस्मानाबादला नेला. टेम्पो चालक भास्कर यांना दोघांनी दिघी येथे सोडले. त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतला.

चाकण पोलिसांसह पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचं पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना या गुन्ह्यातील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार येरवडा बीडी चाळ भागात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पाईपने भरलेला टेम्पो त्यांच्या मूळ गावी येरमाळा आणि वाशी येथे ठेवल्याचं सांगितलं.

पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा आणि दळवेवाडी येथे जाऊन टाटा टेम्पो आणि त्यामधील 900 फिनोलेक्स पाईप असा एकूण 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरलेल्या पाईपपैकी काही पाईप आरोपी त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी वापरणार होते. तर राहिलेले पाईप आणि टेम्पो विकणार होते. मात्र पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत त्यांचा कट उधळून लावला.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.