पीएम केअर फंडमधून 3100 कोटींचं वाटप, पंतप्रधान कार्यालयाकडून मोठी घोषणा

कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM-CARES Fund Trust) यांनी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

पीएम केअर फंडमधून 3100 कोटींचं वाटप, पंतप्रधान कार्यालयाकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM-CARES Fund Trust) यांनी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरवर माहिती देण्यात आली आहे (PM-CARES Fund Trust).

पीएम केअर फंडमधून स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे.

केंद्र सरकार 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील 2000 कोटी रुपयांत 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत.

कोरोनाविरोधात लढताना केंद्र सरकारकडे आर्थिक पाठबळ असणं जरुरीचं आहे. त्यामुळे पीएम केअर फंडची निर्मिती करण्यात आली होती. या फंडमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दानशूरांना मदतीचं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला. अखेर यात कोट्यवधी रुपये जमा झाले. आता केंद्र सरकार याच पैशांचा उपयोग कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरणार आहे.

संंबधित बातम्या :

Aatm Nirbhar Bharat : 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार?

Published On - 12:12 am, Thu, 14 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI