PM Kisan Yojna: लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल 11 व्या हफ्त्याची रक्कम,जाणून घेऊया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सर्वात महत्वाची माहिती!

PM Kisan Samman Nidhi Latest News Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 11व्या हप्त्याची रक्कम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकते परंतु या योजनेचा लाभ काही शेतकऱ्यानाच मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन सोबतच राशन कार्ड नंबर देखील अपडेट केला आहे, अशा शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

PM Kisan Yojna: लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल 11 व्या हफ्त्याची रक्कम,जाणून घेऊया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सर्वात महत्वाची माहिती!
PM kisan yojna
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 11:49 PM

 नवी दिल्लीः भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतामधील 50 टक्के पेक्षा जास्त लोक शेती करतात.जर शेतकर्‍यांनी शेती करणे सोडून दिले तर जगाचे हाल निश्चितच आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या योजना देखील निर्माण केलेल्या आहेत. लहान आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या( PM Kisan Samman Nidhi) 11व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ( bank account) जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत वर्षभरात 6 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना सरकारद्वारे दिले जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 भागांमध्ये दिली जाते.आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आणि 11व्या हप्त्याची रक्कम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची (amount credit) शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये दिली गेली रक्कम

आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आली आहे.प्रत्येक 4 महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांचे आर्थिक मदत म्हणुन रक्कम जमा देखील केली जात आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. या शिवाय सरकारकडून एक मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे. आता रजिस्ट्रेशन करतेवेळी शेतकऱ्यांना राशन कार्ड नंबर देणे अनिवार्य ठरणार आहे,असे न केल्यास लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या तारखेला खात्यात जमा होईल रक्कम..

आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 जानेवारी 2022 ला ट्रान्सफर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान दिला जातो तसेच दुसऱ्या हफत्याची रक्कम 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. या योजनेचा तिसरा हफत्याची रक्कम 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केली जाते, अशा प्रकारे जर पाहायला गेले तर एप्रिलच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते.

अशी करा ई-केवाईसी प्रक्रिया पूर्ण

1) केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in/ भेट द्यायची आहे.

2) या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर किसान कॉर्नर पर्याय वर eKYC लिंक दिसेल.

3) या लिंक वर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला आधार नंबर समाविष्ट करून सर्च बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आवश्यक असलेली माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक केल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.

4) अशाप्रकारे चेक करा आपले स्टेटस

5) आपले स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.

6) आता ‘Farmers Corner’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. यानंतर लाभार्थी यादी वर क्लिक करायचे आहे.

7) आपले राज्य, जिल्हा व उपजिल्हा ब्लॉक आणि गावा ची माहिती समाविष्ट करा.

8) त्यानंतर “गेट रिपोर्ट” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी दिसेल.

9) शेतकऱ्यांना या यादीच्या मार्फत आपल्या हफ्त्या बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

संबंधित बातमी

Devendra Fadnavis : तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होणार?

Pune crime | ते आले अन..कोयत्याने सपासप वार करत केली तरुणाची हत्या; पुण्यात कुठं घडला हा प्रकार?

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या