PM Modi Emotional : उत्कर्ष सोहळ्यात मुलीचे स्वप्न ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावुक, म्हणाले, काही मदत लागली तर सांगा

PM Modi Emotional : उत्कर्ष सोहळ्यात मुलीचे स्वप्न ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावुक, म्हणाले, काही मदत लागली तर सांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: tv9

जेव्हा हेतू स्पष्ट असतो, धोरण स्पष्ट असते, चांगले काम करण्याचा मानस असतो, सर्वांच्या विकासाची भावना असते, तेव्हा त्याचे परिणामही मिळतात

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 12, 2022 | 2:22 PM

नवी दिल्ली : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भरूचमध्ये ‘उत्कर्ष समारंभात’ भाग घेतला. यादरम्यान एका मुलीशी बोलताना ते भावूक झाले. सरकारी योजनांच्या लाभार्थींपैकी एक असलेल्या आयुब पटेल यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न ऐकून भावूक (PM Modi Emotional) झाले. यानंतर ते म्हणाले की, तुझ्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मदत हवी असल्यास तुम्ही मला सांगा. या सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा उत्कर्ष सोहळा (Utkarsh Sohala) या गोष्टीचा पुरावा आहे की, जेव्हा सरकार प्रामाणिकपणे, संकल्पाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याचे किती फलदायी परिणाम होतात. तसेच पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजनांना शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल मी भरूच जिल्हा प्रशासन, गुजरात सरकारचे अभिनंदन करतो.

तसेच अनेकदा माहितीच्या अभावामुळे अनेक लोक हे योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. काही वेळा योजना कागदावरच राहतात. पण जेव्हा हेतू स्पष्ट असतो, धोरण स्पष्ट असते, चांगले काम करण्याचा मानस असतो, सर्वांच्या विकासाची भावना असते, तेव्हा त्याचे परिणामही मिळतात. मी दिल्लीतून देशसेवा करताना 8 वर्षे पूर्ण करत आहे. ही 8 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित होती. आज मी जे काही करू शकतो ते मी तुमच्याकडूनच शिकलो आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच पंतप्रधान पुढे म्हणाले, 2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली. तेव्हा देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या शौचालय, लसीकरण सुविधा, वीज कनेक्शन सुविधा, बँक खाती यापासून वंचित होती. सर्वांच्या प्रयत्नांमुळे अनेक योजना 100% च्या जवळ आणण्यात यशस्वी झाल्या आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें