पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, पोलीस प्रशासनाच्या हालचाली

| Updated on: Apr 29, 2020 | 12:13 PM

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्यानं कमी होताना दिसत नाही. रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचा आकडाही वाढत (Pune Police Strict rule lockdown) आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, पोलीस प्रशासनाच्या हालचाली
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्यानं कमी होताना दिसत नाही. रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचा आकडाही वाढत (Pune Police Strict rules during lockdown) आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध घालण्याचा पोलीस प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांनी प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार दाट लोकवस्ती असलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भागात अतिरिक्त निर्बंध लावले जातील, अशी माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी (Pune Police Strict rules during lockdown) दिली.

“रुग्ण वाढत असलेल्या ठिकाणांवर आम्ही नजर ठेवून आहोत. यासंदर्भात नागरिकांना पूर्वकल्पना देऊन निर्णय घेतला जाणार आहे”, असं शिसवे यांनी सांगितलं.

सिम्बॉयसिस रुग्णालयात पोलिसांसाठी राखीव वॉर्ड

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये अद्यावत वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. 50 बेडचा हा वॉर्ड पोलिसांसाठी राखीव ठेवला आहे. त्याचबरोबर दिनानाथ आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन हॉस्पिटलमध्येही आम्हाला काही बेड राखीव मिळणार असल्याची माहिती शिसवे यांनी दिली. कोणत्याही पोलीसाला लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोना बाधित पोलिसांसाठी बिनव्याज एका लाख रुपये

“कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ पोलिसांना दहा हजाराचा रिवॉर्ड दिला जाणार आहे. हे बक्षीस पोलीस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिली जाणार आहे”, असं शिसवे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 9318 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 400 जणांचो कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा…

पुण्यात कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा

पुण्यात 143 नवे कोरोनाबाधित, एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या