पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपत्यांच्या संख्येवरुन नाव न घेता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. आता तो वाद पुन्हा एकदा पोटला असून या मुद्द्यावर बिहारचं राजकारण तापलं आहे. याला प्रत्युत्तर देताना राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोले लगावले. “नितीश यांच्या या वक्तव्यानंतर लोक म्हणत होते की नितीश कुमार यांनी मुलगी होईल या भीतीने दुसरं अपत्य होऊ दिलं नाही, पण मी प्रचारात तसं म्हणालो नाही. इतक्या अनुभवी मुख्यमंत्र्याला माझ्या बहिणींना राजकारणात ओढणं शोभत नाही,” असं मत तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलं आहे (Political war in JDU Nitish Kumar and RJD Tejaswi Yadav on Birth rate ).