लॉकडाऊन हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरुन कायदा हाती घेऊ : प्रकाश आंबेडकर

लॉकडाऊन हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरुन कायदा हाती घेऊ : प्रकाश आंबेडकर

राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन हटवा, अन्यथा आम्ही 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे (Prakash Ambedkar demands to Unlock Maharashtra).

चेतन पाटील

|

Aug 06, 2020 | 6:06 PM

पुणे : “राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं आहे (Prakash Ambedkar demands to Unlock Maharashtra). मात्र, राज्य सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षापेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच 2019 साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटावावा आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा. अन्यथा आम्ही 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ“, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे (Prakash Ambedkar demands to Unlock Maharashtra).

“दुकानांची सम-विषम ही पद्धत कधी संपवणार आहात? छोटे दुकानदार, टपरिवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ संकटात आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही. एसटी रस्तावर कधी धावेल त्याची तारीख सांगा. सरकार हे सांगणार नसेल तर 10 ऑगस्टनंतर कधीही आम्ही रस्त्यावर उतरु”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“लोकांचे हाल होत आहेत. या महिन्यात पाऊस 15 दिवस पडणार असल्याचा अंदाज आहे. कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील धरणं 40 ते 70 टक्के भरले आहेत. पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोना-कोराना करण्याऐवजी पुराचे नियोजन सांगा. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. तरीही सरकार गंभीर नाही”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“सरकारने फिक्स टाईमटेबल सांगावं. कधी काय सुरु करणार ते सांगावं. सध्या सर्व राम भरोसे सुरु आहे. सध्या सरकारी पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत. कलेक्टर निर्णय घेतात, हे पूर्ण चुकीचं आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालढकल करत आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“मुंबईत बेस्ट मोठा संख्येने सुरु करा. सरकारने अनलॉक प्रत्यक्ष सुरु करावं. अन्यथा दहा ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरुन कधीही कायदा हातात घेऊ”, असा इशारा प्रकाश आंबेडक यांनी दिला.

“80 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. 5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस का धरता? सरकारनं आता लॉकडाऊन का? याबाबत स्पष्टीकरण द्यावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका. जात किंवा धर्माचा कोणीही नेता होतो. मात्र राज्याचा नेता व्हा“, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली नाही.

अंतिम वर्षांच्या परीक्षेवर भाष्य

प्रकाश आंबेडकर यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्य सरकार आणि युजीसी यांच्यात सुरु असलेल्या मतभेदावरही भाष्य केलं. “परीक्षाबाबतचे अधिकार यूजीसीला आहेत. याबाबत मंत्र्यांना अधिकार नाहीत. मंत्र्यांना कायदा कळत नाही. विद्यार्थ्याचा कोरोनामुळे पास असा उल्लेख केल्यास त्याला काय फायदा? त्याला नोकरी मिळेल याची खात्री नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा : महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें