विरारमध्ये PPE किट घालून मनोरुग्णाचा खुलेआम वावर, रस्त्यावरुन जाणाऱ्यांची घाबरगुंडी

विरार परिसरात पीपीई किट घालून एक मनोरुग्ण खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचं समोर आलं (Psycho Man wearing PPE kit in Vasai Virar).

विरारमध्ये PPE किट घालून मनोरुग्णाचा खुलेआम वावर, रस्त्यावरुन जाणाऱ्यांची घाबरगुंडी
vasai virar municipal corporation
| Updated on: Jul 06, 2020 | 12:40 PM

ठाणे : कोरोना महामारीच्या जागतिक संकटाने सर्वच जण हैराण आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशासह आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे वसई विरार महापालिका हद्दीत आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विरार परिसरात पीपीई किट घालून एक मनोरुग्ण खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचं समोर आलं (Psycho Man wearing PPE kit in Vasai Virar). त्यामुळे वसई विरार आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतक्या महत्त्वाच्या वैद्यकीय साधनांची सुरक्षितता काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रविवारी (5 जुलै) दिवसभर हा मनोरुग्ण विरार पूर्व परिसरात फिरत होता. एका जागरुक नागरिकाने या प्रकाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आतापर्यंत पीपीई किट आणि एन-95 मास्कच्या कमतरतेची तक्रार करत आरोग्य विभागाकडून पुर्ततेची मागणी होत होती. मात्र, पीपीई कीटचा हट्ट करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी चक्क मनोरुग्णच पीपीई कीट घालून शहरात फिरल्याने वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागावर जोरदार टीका होत आहे. तसेच पालिकेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित पीपीई किट या मनोरुग्णाकडे कशी आली. ती आधी कुणी वापरली होती का? त्या किटला कोरोना संसर्गाची शक्यता आणि मनोरुग्ण फिरलेल्या भागात हा संसर्ग वाढण्याचा धोका अशा अनेक शक्यता तयार झाल्या आहेत. त्यामुळे यावर वसई विरार आरोग्य विभागाच्या उत्तरानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौरा वादावर मंत्री छगन भुजबळांकडून पडदा

मास्क न घातल्यास 10 हजार दंड, केरळचा निर्णय, 2021 पर्यंत निर्बंध

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 6 जुलै

Psycho Man wearing PPE kit in Vasai Virar