Pandurang Raykar Death | ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये कमतरता झाली का?, पांडुरंग रायकरांच्या मृत्यूनंतर पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

| Updated on: Sep 02, 2020 | 8:31 PM

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Pandurang Raykar Death | ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये कमतरता झाली का?, पांडुरंग रायकरांच्या मृत्यूनंतर पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
Follow us on

पुणे :  ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं (Pune Commissioner Gave Order For Inquiry Of Pandurang Raykars Death). पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पांडुरंग रायकर यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे (Pune Commissioner Gave Order For Inquiry Of Pandurang Raykars Death).

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये कमतरला झाली का?, याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना हे आदेश देण्यात आले आहेत.

पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू 

संयत पण जिगरबाज पत्रकारिता करता करता पांडुरंग यांना कोरोनाने गाठलं. लढवय्या पांडुरंग यांनी कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. मात्र, ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. पांडुरंग हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र, धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

लढवय्या पांडुरंग यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या कशा पसरल्या आहेत, याकडे बोट दाखवणारी बाब आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा कितीही दावा करत असले, तरी पुण्यात व्हेंटिलेटर न मिळणं आणि त्यापेक्षा अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध न होणं हे सरकारी दाव्याचा फोलपणा उघडा पाडतं (Pune Commissioner Gave Order For Inquiry Of Pandurang Raykars Death).

अजित पवारांकडून चौकशीचे आदेश 

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

बेड वाढवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे प्रयत्न

पांडुरंग रायकर यांचा जीव गेला, हे निश्चित दु:खदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात लक्ष दिलं जातं आहे, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं आहे. ग्रामीण भागात‌ कोरोना पसरत‌ आहे, हे खरे असले, तरी बेड‌ कमी पडत‌ असतील तरी ते वाढवण्याचा‌ प्रयत्न केला‌ जात आहे. अँटिजन टेस्ट केल्या जातात त्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

Pune Commissioner Gave Order For Inquiry Of Pandurang Raykars Death

संबंधित बातम्या :

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प

होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन