Lockdown 4 | पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना, कंटेनमेंट झोन 64 वर, काय आहेत बदल?

| Updated on: May 20, 2020 | 10:16 AM

नवीन नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्राचा काही भाग वगळण्यात आला आहे. तर नव्याने काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. (Pune Containment Zone Restructure Lockdown 4)

Lockdown 4 | पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना, कंटेनमेंट झोन 64 वर, काय आहेत बदल?
Follow us on

पुणे : राज्य सरकारने चौथा लॉकडाऊन जाहीर करुन नियमावली ठरवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि बाहेरील भागाची पुनर्रचना करण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याच्या 330 चौरस किलोमीटरपैकी 10.48 चौरस किलोमीटर भाग प्रतिबंधित असणार आहे. (Pune Containment Zone Restructure Lockdown 4)

प्रतिबंधित क्षेत्रात काही भाग वगळण्यात तर काही भाग नव्याने समाविष्ट केला आहे. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानेही उघडली जाणार आहेत. काही मार्गांवर पीएमपीएलही धावणार आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनबाहेरील पुणे पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

नवीन नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्राचा काही भाग वगळण्यात आला आहे. तर नव्याने काही भाग प्रतिबंधित करण्यात आलाय. 69 प्रतिबंधित क्षेत्रापैकी आता 64 कंटेनमेंट झोन असतील. पाच कंटेनमेंट झोन प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत.

पूर्वीच्या 69 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 24 भागात एकही नवीन बाधित रुग्ण आढळला नाही. दहा दिवसात नवीन रुग्ण न आढळल्याने हा भाग रेड झोन मधून वगळला आहे. इथल्या नागरिकांनी दक्षता घेतल्यानं त्यांना दिलासा मिळाला. तर रुग्ण आढळलेले 19 नवीन झोन वाढवण्यात आले आहेत. तर चार झोनचं क्षेत्र कमी झालं आहे.

हेही वाचा : कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली

ज्येष्ठ नागरिकांनाही आता दिलासा देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरकाम करणाऱ्या महिलांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील महिलांना ही परवानगी आहे. कोरोना संदर्भात योग्य त्या दक्षतेच्या उपायोजना राबवणं बंधनकारक आहे. (Pune Containment Zone Restructure Lockdown 4)

शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानेही उघडली जाणार आहेत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, सिंहगड रोड, टिळक रोड दुकान उघडण्यास परवानगी दिली. मात्र कोणतं दुकान कोणत्या वारी आणि केव्हा उघडायचं, याबाबतची नियमावली ठरवली जाणार आहे.

हेही वाचा : घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी, पुण्यातील ज्येष्ठांना मोठा आधार

छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकानं, शेतीसंबंधी दुकाने उघडण्यास परवानगी आहे. तर शहरातील महत्त्वाच्या भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.