AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात ‘लॉकडाऊन जोडप्यां’मध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला, नवरोबांना ‘क्वारंटाईन’चा इशारा

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरीय 'महिला दक्षता समिती' गठीत करण्यात आली आहे (Pune Domestic Violence increased husbands warned to send in institutional quarantine)

पुण्यात 'लॉकडाऊन जोडप्यां'मध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला, नवरोबांना 'क्वारंटाईन'चा इशारा
| Updated on: Apr 17, 2020 | 4:33 PM
Share

पुणे : लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस एकमेकांची तोंडं पाहून नवरा-बायकोचे वाद वाढल्याचे विनोद सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यात खरंच लॉकडाऊन दरम्यान हिंसाचाराची प्रकरणं वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. समज देऊनही न ऐकणाऱ्या भांडकुदळ नवरोबांना ‘संस्थात्मक क्वारंटाईन’ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Pune Domestic Violence increased husbands warned to send in institutional quarantine)

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरीय ‘महिला दक्षता समिती’ गठीत करण्यात आली आहे. समितीत ग्रामपंचायत महिला सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्य, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असेल. ग्रामपंचायतीमधील ज्येष्ठ महिला या समितीची प्रमुख असेल.

हेही वाचा : पुणे पोलिसांचं मिशन ‘ऑल आऊट’, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या ‘मच्छरां’वर कारवाई

कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडल्यास पतीचं समुपदेशन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र समुपदेशन केल्यानंतरही काही सुधारणा न झाल्यास संबंधित पतीला संस्थात्मक क्वारंटाईन (institutional quarantine) करावं, यासाठी पोलीस निरीक्षकांची मदत घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील ‘या’ सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याशी समन्वय साधावा, महिला दक्षता समितीला सांगण्यात आलं आहे.

(Pune Domestic Violence increased husbands warned to send in institutional quarantine)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.