पुण्यात थरार! 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या; 3-4 जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात थरार! 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या; 3-4 जणांचा जागीच मृत्यू

नवले पुलाजवळ 15 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. भर दिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 06, 2020 | 12:18 PM

पुणे : कोरोनाच्या भीषण काळात अनेक धक्कादायक अपघात झाल्याचं आपण पाहिलं आहे. असाच एक विचित्र अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्यांचा एकत्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (pune news 15 vehical accident in pune 3 to 4 died on spot)

नवले पुलाजवळ 15 गाड्या एकमेकांना धडकल्या. भर दिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. थोड्या वेळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांना पाचाराण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाती वाहन चालकांची चौकशी सुरू केली आहे. फोटोवरून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गाड्या विचित्र पद्धतीने एकमेकांना धडकल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी रस्त्यामधील वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी 3-4 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या –

अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू नजीब तारकाईचं निधन, 22 तास होता कोमात

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग ‘हे’ नियम वाचाच

(pune news 15 vehical accident in pune 3 to 4 died on spot)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें