चरस-गांजाचा अड्डा सांगणाऱ्या ट्विटर युझरला पुणे पोलिसांचं जबरदस्त उत्तर

| Updated on: Jan 01, 2020 | 12:27 PM

पुणे पोलिसांना टॅग करत अप्रतिम नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं. ‘ जर मी तुम्हा लोकांना अड्डा सांगितला, तर 10 पुड्या माझ्या? चालेल ना सर?' यावर पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिलं.

चरस-गांजाचा अड्डा सांगणाऱ्या ट्विटर युझरला पुणे पोलिसांचं जबरदस्त उत्तर
Follow us on

पुणे : ट्विटरवर कोण जास्त विनोदी आहे, यावरुन सध्या मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांमध्ये शर्यत सुरु आहे. मात्र, यावेळी पुणे पोलिसांनी बाजी मारली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे पोलिसांचं एक ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. पुणे पोलिसांना टॅग करत अप्रतिम नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं. ‘ जर मी तुम्हा लोकांना अड्डा सांगितला, तर 10 पुड्या माझ्या? चालेल ना सर?’ यावर पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिलं.

अप्रतिमच्या या ट्वीटवर पुणे पोलिसांनी रिट्वीट केलं. ‘तुम्ही सर्व पुड्या ठेवून घ्या, आम्ही फक्त तुम्हाला ठेवून घेऊ. चालेल ना सर?’. पुणे पोलिसांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी पाहता पुणे पोलिसांनी तरुणांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात अंमलीपदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. “चरस, गांजा, म्याऊं म्याऊं. #NewYearResolution 2020 मध्ये हे सर्व नको भाऊ!!”, असं ट्वीट पुणे पोलिसांनी केलं होतं. त्यानंतर अनेकांनी पुणे पोलिसांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. अप्रतिम यांची प्रतिक्रियाही त्यापैकीच एक होती.

पुणे पोलिसांच्या या ट्वीटवरुन त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, पुणे पोलिसांनी आपल्या अनोख्या अंदाजात या ट्रोलर्सनाचं ट्रोल केलं आहे.

अप्रतिम यांच्या ट्वीट नंतर एकाने लिहिलं की, ‘ माझ्यासाठीही थोडं ठेवाल’. यावर पुणे पोलिसांनी म्हटलं, ‘या. तुमचं स्वागत आहे. पोलीस स्थानकाचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले आहेत’.

तर एका युझरने रिसर्चसाठी पुणे पोलिसांचा पत्ता मागितला. यावर ‘आम्ही तुम्हाला पर्सनली सांगू शकतो. तुमच्या सुविधेनुसार तुम्ही कुठल्याही पोलीस स्थानकात पोहोचा’, असं पुणे पोलीस म्हणाले.

पाहा पुणे पोलिसांचे काही मजेशीर ट्वीट

Pune Police Humorous Tweet