पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू

ससून रुग्णालयात उपचारादरम्यान एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 100 वर पोहोचला (Pune Corona Patient Died) आहे.

पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 8:42 AM

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांसह कोरोना बळींचाही आकडा वाढत चालला (Pune Corona Patient Died) आहे. पुण्यात आज (2 मे) आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान एका 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 100 वर पोहोचला आहे.

पुण्यातील घोरपडी परिसरात एका 68 वर्षीय संशयित रुग्णाला 21 एप्रिलला (Pune Corona Patient Died) ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट 24 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाचा 2 मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. दरम्यान यामुळे पुण्यात कोरोनाबाधित मृत्यूंचा आकडा 100 वर पोहोचला आहे.

दरम्यान काल (1 मे) पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा  1 हजार 815 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 7 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात काल 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 611 झाली आहे. सद्यस्थितीत पुण्यात अॅक्टिव रुग्ण 1195 आहे. यातील 64 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार पार 

महाराष्ट्रात काल (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Pune Corona Patient Died) दिली.

संबंधित बातम्या : 

Pune Corona : पुण्यात 24 तासात 7 कोरोनाबळी, रुग्णांची संख्या 1815 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.