पुण्यातील सोसायटीकडून कोरोना रुग्णांच्या कुटुंबाची जबाबदारी, जेवणापासून औषधाची सोय

पुण्यातील पौड रोडवर असणाऱ्या सिल्व्हर क्रिस्ट सोसायटीत राहणारे एका दाम्पत्याला कोरोना (Pune Society Took Responsibility of Corona Positive family) झाला.

पुण्यातील सोसायटीकडून कोरोना रुग्णांच्या कुटुंबाची जबाबदारी, जेवणापासून औषधाची सोय
| Updated on: Jul 27, 2020 | 4:39 PM

पुणे : एखाद्या सोसायटीत किंवा शेजारच्या घरात राहणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली की त्या व्यक्तीला वाळीत टाकल्याचे अनेक प्रकार आपण ऐकलेत. पण पुण्यात मात्र याउलट प्रकार घडला आहे. पुण्यातील एका सोसायटीमध्ये एक कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्या सोसायटीतील सदस्यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी घेत त्यांना आधार दिला आहे. (Pune Society Took Responsibility of Corona Positive family)

पुण्यातील पौड रोडवर असणाऱ्या सिल्व्हर क्रिस्ट सोसायटीत राहणारे एका दाम्पत्याला कोरोना झाला. सुदैवाने त्यांचा 17 वर्षीय लहान मुलगा हा कोरोना निगेटिव्ह होता. त्या दाम्पत्याने रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी घरातलं कस करायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्या दाम्पत्याने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सोसायटीत सांगितले. त्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्यांच्या जेवणापासून औषधापर्यंतची सगळी जबाबदारी घेत त्यांना सुखद धक्का दिला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

सिल्व्हर क्रिस्ट सोसायटीत साधारण 104 फ्लॅट आहेत. यात साधारण पाचशे लोक राहतात. सध्या सोसायटी आणखी दोन कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यावर कोरोना केव्हाही आपल्या दारात येईल हे ओळखून सोसायटीतील सर्व सदस्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली होती. तसेच कोणी पॉझिटिव्ह आल्यास त्याची जबाबदारी घेण्याचही निश्चित केलं होतं.

कोरोना झाल्यावर येणाऱ्या वाईट अनुभवामुळे अनेक जण हा आजार लपवत आहेत. त्याचमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो आहे. कोरोना झाल्यावर त्या व्यक्तीला वाईट वागणूक न देता मानसिक आधार देण जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच पुण्यातील सिल्व्हर क्रिस्ट या सोसायटीतील रहिवाशांचे अनुकरण प्रत्येकानं करायला हवं.  (Pune Society Took Responsibility of Corona Positive family)

संबंधित बातम्या : 

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

Pune Budhwar Peth | बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री, गर्भवतीसह पाच जणांना कोरोना