नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले, पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळली

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : हेल्मेट सक्ती असो, किंवा फटाक्यांवरील निर्बंध, पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात हे पुन्हा एकदा समोर आलंय. वाहनांच्या वाढत्या संख्येने पुण्याचं प्रदूषण धोक्याच्या उंबरठ्यावर असताना त्यात आणखी भर पाडली आहे. पुणेकरांनी दिवाळीत केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी पुणेकरांनी सर्वाधिक फटके वाजवल्याने शहर अतिप्रदूषित झाल्याचं समोर […]

नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले, पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळली
Follow us on

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : हेल्मेट सक्ती असो, किंवा फटाक्यांवरील निर्बंध, पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात हे पुन्हा एकदा समोर आलंय. वाहनांच्या वाढत्या संख्येने पुण्याचं प्रदूषण धोक्याच्या उंबरठ्यावर असताना त्यात आणखी भर पाडली आहे. पुणेकरांनी दिवाळीत केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी पुणेकरांनी सर्वाधिक फटके वाजवल्याने शहर अतिप्रदूषित झाल्याचं समोर आलंय.

पुणेकर स्वतःचे नियम स्वतःच ठरवतात, असं गमतीने म्हटलं जातं. मात्र हेच म्हणणं खरं ठरलंय. पुणेकरांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झालेलं प्रदूषण ‘अतिप्रदूषित’ या वर्गात मोडणारं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने बंधन घालूनही पुणेकर मात्र निर्बंध राहिले.

सफर विभागाच्या नोंदीनुसार सोमवार ते शनिवार या कालावधीत पुण्यात हवेची सरासरी गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र, लक्ष्मीपूजनाची रात्र आणि पाडव्याची पहाट या दरम्यान हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात फटाक्यांच्या विक्रीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे पहिल्या दिवशी फटाक्यांचा आवाज बंद झाल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाल्याचे दिसून येत असतानाच, लक्ष्मीपूजनादिवशी मात्र जोरदार फटाकेबाजी झाल्याने प्रदूषणाचे गेल्यावर्षीचे रेकॉर्डही मोडीत निघाले.

यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास घातलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाला. फटाके विक्री आणि फटाके फोडण्याच्या संख्येतही घट नोंदविली गेली. मात्र यामुळे प्रत्यक्षात वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा असताना, ते गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं. तर इतर दिवशी ते गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र बर्‍याच प्रमाणात कमी आढळून आलं. सफर – इंडिया या संस्थेने केलेल्या चाचणीत ही माहिती समोर आली आहे.

प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि विविध संस्थांनी फटाके वाजवूच नये, यासाठी मोहिम हाती घेतली.मात्र याचा फारसा परिणाम पुणेकरांवर झाला नाही. आधीच वाहनांच्या प्रदूषणामुळे पुण्याची हवा प्रदूषित झालीय. त्यात फटाक्याबाबतही पुणेकरांनी आघाडी घेतल्याने पुण्याची दिल्ली व्हायला, फारसा वेळ लागणार नाही.