कोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!

चीनसह जगभरात भीती निर्माण केलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर पुण्यात (Pune Coronavirus vaccine) लस विकसित करण्यात आली आहे.

कोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 10:43 AM

पुणे :  चीनसह जगभरात भीती निर्माण केलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर पुण्यात (Pune Coronavirus vaccine) लस विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, (Punes Serum Institute) अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित (American biotechnology firm Codagenix) केली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी (Pune Coronavirus vaccine) ही लस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करण्यात आली असून, सहा महिन्यांनतर रुग्णावर या लसीची चाचणी केली जाणार आहे.

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे, असा दावा संस्थेने केला आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखता येऊ शकेल. ही भारतातील पहिली लस असेल, जी इतक्या वेगाने या स्तरापर्यंत आणण्यात यश मिळालं आहे, असं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे.

या लसीच्या मानवी चाचणीनंतर तिला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर तिचा प्रत्यक्ष वापराला सुरुवात केली जाऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.

चीनमध्ये कोरोनाची दहशत

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अक्षरश: दहशत पसरवली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 1800 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरातून हा विषाणू संपूर्ण देशात आणि त्यानंतर आजूबाजूच्या देशांमध्येही पसरला.

चीनच्या कोरोना विषाणूबाबत भारतही खबरदारी घेत आहे. चीन, जपान, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या जवळपास एक लाख प्रवाशांची थर्मल तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आंतराराष्ट्रीय विमान तळांवर विशेषज्ञ नियुक्त केले आहेत. सध्या देशातील 21 विमान तळांवर थर्मल स्क्रीनिंग सुरु आहे.

कोरोना विषाणूची लक्षणं

नाक गळणं, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखी आणि ताप ही कोरोना विषाणूची लक्षण आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूची लागण लवकर होते. वयस्कर आणि लहान मुलांना या विषाणूची लागण सहज होते. निमोनिया, फुफ्फुसांमध्ये सूज, शिंका येणे, दमा इत्यादीही या विषाणूची लक्षणं असू शकतात.

विषाणूपासून बचावाचे उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राने ट्वीट करत यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.

1.हात साबणाने स्वच्छ धुवावे. 2. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोडांवर रुमाल ठेवावा. 3. ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं असतील त्यांनी गर्दीत जाणे टाळावं. 4. मांस आणि अंडी नीट शिजवून घ्यावी. 5. जंगल किंवा शेतात काम करणारे, राहणाऱ्यांनी जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

कोरोना विषाणूवर उपचार

कोरोना विषाणूचा अद्याप कुठलाही उपचार किंवा निदान सापडलेलं नाही. कोरोना विषाणूवर अद्याप कुठलीही वॅक्सीन उपलब्ध नाही. यापासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काळजी घेणे. कुठल्याही आजारी व्यक्ती, सर्दी, निमोनियाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा. मास्क घाला. डोळे, नाक आणि तोडांला स्पर्श करणे टाळा. नेहमी हात स्वच्छ धुवा.

संबंधित बातम्या 

‘डेटॉल’ कोरोना व्हायरस रोखू शकतो? 

जीवघेणा कोरोना वायरस भारतात दाखल, देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.