AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची 23 लाखांना फसवणूक

पंजाबमधील पटियालातून काँग्रेस खासदार असलेल्या परनीत कौर यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी स्वतःला बँक मॅनेजर असल्याचं सांगत आरोपीने फोन केला होता

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची 23 लाखांना फसवणूक
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 08, 2019 | 11:25 AM
Share

चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Punjab CM Amrinder Singh) यांच्या पत्नी परनीत कौर (Preneer Kaur) यांची 23 लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. स्वतःला बँक मॅनेजर म्हणवणाऱ्या ठकसेनाने परनीत यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ही रक्कम काढून घेतली.

पंजाबमधील पटियालातून काँग्रेस खासदार असलेल्या परनीत कौर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. आरोपीने आपण बँक मॅनेजर बोलत असल्याचा फोन परनीत यांना केला होता. त्यावेळी परनीत संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. वेतन जमा करण्यासाठी त्याने परनीत यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली.

परनीत कौर यांच्या बँक अकाऊण्ट नंबरसोबतच एटीएम पिन, सीवीसी नंबर आणि ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळवण्यातही आरोपी यशस्वी झाला. खात्यातून 23 लाखांची रक्कम काढल्याचा एसएमएस परनीत यांना आला, तेव्हा त्यांना या फसवणुकीविषयी समजलं.

फोन कॉलची पडताळणी करुन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील रांचीतून आरोपीला अटक केली.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट