औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत जोरदार गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

| Updated on: Dec 07, 2020 | 12:17 PM

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत जोरदार गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
Follow us on

औरंगाबाद : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरु असतानाच काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी समाजासाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित करताच नेत्यांच्या समर्थकांनी आक्रमक रुप घेतलं. यातूनच झालेल्या वादाचं रुपांतर धक्काबुक्की आणि बाचाबाचीतही झालं (Quarrel in meeting of Minister Vijay Wadettiwar on OBC reservation issue in Aurangabad).

विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत गोंधळ झाल्यानं याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच ओबीसी नेत्यांमध्येच गट पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या या बैठकांमधील हे वाद थांबणार की असेच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

दरम्यान, याआधी विजय वडेट्टीवारांनी ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढण्याचा इशारा दिला होता. सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळप्रसंगी ओबीसींचीही शक्ती दाखवू. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलं होतं. ते  नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले होते, “ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे. ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको.”

गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा नेत्यांवरही आगपाखड केली होती. मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला, तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला होता. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवाल वडेट्टीवारांनी विचारला होता.

संबंधित बातम्या :

मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? : विजय वडेट्टीवार

व्हिडीओ पाहा :

Quarrel in meeting of Minister Vijay Wadettiwar on OBC reservation issue in Aurangabad