रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या

| Updated on: Jun 01, 2020 | 3:33 PM

पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांची रविवारी सायंकाळी लाठी, काठी, बांबूंनी मारहाण करुन हत्या करण्यात आली (Raigad Poladpur Shivsena Worker Murder)

रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या
Follow us on

रायगड : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात गुन्ह्यांची संख्या कमी झाली असली, तरी राजकीय वैर काही कमी झालेले दिसत नाही. रायगडमधील पोलादपूर तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Raigad Poladpur Shivsena Worker Murder)

पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांच्यावर रविवारी सायंकाळी लाठी, काठी, बांबूंनी मारहाण करुन हल्ला करण्यात आला. पुरातन शिव मंदिराच्या तलावाजवळ त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव आणि अन्य सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, बीडमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

यावेळी दोन आरोपींनी मांढरे यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगण्यात येते, मात्र मृताच्या अंगावरील मार भीषण स्वरुपाचा असल्याने पोलीस तपास कसोशीने सुरु झाला आहे. सायंकाळी पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह आणल्यानंतर युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विकास गोगावले यांनी सहकाऱ्यांसोबत भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी करण्यात आली. मात्र आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयत गणपत मांढरे यांच्या मुलाने घेतला.