राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, सिंदखेड राजात जय जिजाऊंचा जयघोष

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 421 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी सूर्योदयावेळी जिजाऊ माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी जिजाऊ भक्तांनी अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा दिला. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. त्यामुळेच जिजाऊंच्या जन्मस्थळी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून […]

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, सिंदखेड राजात जय जिजाऊंचा जयघोष
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 421 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी सूर्योदयावेळी जिजाऊ माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी जिजाऊ भक्तांनी अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा दिला. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. त्यामुळेच जिजाऊंच्या जन्मस्थळी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

जिजाऊंचे जन्मस्थानापासून जिजाऊ सृष्टीपर्यंत भव्य मिरवणूकही काढण्यात आली. जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून, या उत्सवासाठी देशभरातील लाखो  जिजाऊ भक्त जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी  येत आहेत.

आज जिजाऊ जयंतीनिमित्त दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि  पुरस्कार वितरण होणार आहे.

यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेचे निर्माते आणि संभाजीराजेंची भूमिका साकारणारे डॉ अमोल कोल्हे हे  उपस्थित राहणार आहेत. तर छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले हे सुद्धा उपस्थित असतील. याशिवाय सर्जिकल स्ट्राईकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना मराठा सेवा संघाचा सर्वोच मानला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.