उल्हासनगर शहरातील स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत. यातील बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्याने मृतदेहाचे दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या धूराने प्रदूषण होत आहे. स्मशानातील धूर हा हवेबरोबर इतरत्र पसरून आसपासच्या इमारतीत राहणार्या नागरिकांच्या घरात जातोय. येणार्या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.