AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exam 2026 : पोरांनो कॉपी कराल तर मोठं नुकसान, यंदा इयत्ता 10 वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी खास मोहीम!

येत्या 20 फेब्रुवारी रोजीपासून इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त असाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्यात 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी या परीक्षांची नोंदणी केलेली आहे.

SSC Exam 2026 : पोरांनो कॉपी कराल तर मोठं नुकसान, यंदा इयत्ता 10 वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी खास मोहीम!
ssc exam 2026Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2026 | 4:49 PM
Share

SSC Exam 2026 : राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हीच बाब लक्षात घेता इयत्ता दावीच्या परीक्षांमध्ये असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. कॉपी करण्याच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी शिक्षण मंडळातर्फे प्रयत्न केले जात आहेत. सोबतच अशा गैरप्रकारांत कोणी आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी कॉपीच्या प्रकारांवरही भाष्य केलं. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यात 8 लाख 65 हजार 740 मुले तर 7 लाख 49 हजार 736 मुली आहेत. यावेळी १३ ट्रान्सजेंडर इयत्ता दहावीची परीक्षा देणार आहेत अशी माहिती बेंडसे यांनी दिली.

कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष प्रयत्न

26 हजार 683 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 511 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे. यावेळी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना योग्य संदेश पाठवण्यात येणार आहे. 33 हजार शिक्षक कर्मचारी, मुख्याध्यापक यांना कॉपीमुक्त अभियाना संदर्भात ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सअॅपद्वारे कळविण्यात आलेले आहे.

554 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत

कॉफीमुक्त अभियाना अंतर्गत संदेश देण्यासाठी समाजातील मान्यवरांचे व्हिडिओ मंडळाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 554 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत, असेही बेंडसे यांनी यावेळी सांगितले.

सामूहिक कॉपीप्रकरणी २६ कर्मचारी निलंबित

दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा येथे सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य मंडळाने आणि जिल्हा दक्षता समितीने ही कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी २६ जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान वाशीम जिल्ह्यातील श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा या परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना हा प्रकार घडला.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?