AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्राईल-US युद्ध जास्त लांबणार ? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?

इराण आणि इस्राईल-अमेरिका युद्धाचा भडका उडाला असला तरी या युद्धाला जास्त काळ लांबवणे कोणालाही शक्य नसल्याचे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्या बोलताना म्हटले आहे.

इराण-इस्राईल-US युद्ध जास्त लांबणार ? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?
Retired Colonel Abhay Patwardhan
| Updated on: Mar 02, 2026 | 8:19 PM
Share

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्याने पश्चिम आशिया धगधगत आहे. या युद्धात अनेक देशांना इराणने जरी लक्ष्य केले असले तरी यात इराण जादा काळ युद्ध वाढवले असे वाटत नाही आणि इतरही देश यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. हे युद्ध तीन देशांपुरतेच मर्यादित राहणार असल्याचा दावा निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला आहे.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी यावेळी सांगितले की इतर देशांनी या युद्धात उडी घेतली असे मी म्हणणार नाही, युनायटेड किंग्डम सोडलं तर इतर दुसऱ्या कुठल्याही देशांनी अमेरिकेला किंवा इराणला मदत करू असं म्हटलेले नाही. ब्रिटनने फक्त आमच्या एअर बेसवर तुम्ही आपले एअरक्राफ्ट ठेवून वापरू शकता असे अमेरिकेला सांगितले आहे. मात्र, आखाती देशांमध्ये इराणने अमेरिकन सैन्य असलेल्या बेसला लक्ष केले आहे. त्यामध्ये इराणने दुबईमध्ये बुर्ज खलिफा असलेल्या ठिकाणी काही नुकसान केले, त्याबद्दल नंतर माफी मागितली आहे.

युद्धाचा अमेरिका आणि युरोपला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. जवळपास साडेचार हजार फ्लाईट त्या मार्गावरून जातात. त्यामुळे आता इतर देशांनी त्यात उडी घेतली असे म्हणू शकत नाही, पण काल ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संसदेत सांगितले की आम्ही आमचे बेस अमेरिकेला वापरु देणार नाही. अमेरिकेच्या बेसला मध्य पूर्वेत आणि आफ्रिकेतल्या बेसला लक्ष्य केले आहे. ब्रिटिश बेसवर सुद्धा त्यांनी आज सकाळी हल्ला केला आहे. जे अमेरिकेला मदत करतात आणि अमेरिकन सैन्य आणि ब्रिटिश सैन्य आहे. त्या ठिकाणी इराण लक्ष्य करेल असे दिसून येत आहे, हे युद्ध खूप मोठे होणार असे दिसून येत नाही असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.

युद्धाचा खर्च प्रचंड मोठा

युद्ध हे अतिशय खर्चिक काम आहे, एका अंदाजानुसार इराणकडे जवळपास साडेसहा हजार ड्रोन आहेत. आपण एक गोष्ट लक्ष ठेवली पाहिजे की एका ड्रोनला मारण्यासाठी तीन किंवा चार मिसाईल मारावे लागतात. इंटरसिटी मिसाईल पाडण्यासाठी एकाला दोन किंवा तीन मिसाईल डागाव्या लागतात. प्रत्येक दिवशी किमान 100 ते 200 मिसाईल इराण डागत असेल तर अमेरिकेला आणि इस्राईलला किती खर्च लागत असेल ? कारण एक इंटर सेप्टर मिसाईल बनवायला 15 दश लक्ष रुपये लागतात. तशा 300 मिसाईलचा विचार केला तर हे फार खर्चिक काम आहे. खर्चिकच नाही तर मिसाईलची निर्मिती सुद्धा विमानासारखी असते, ती बंदुकीच्या गोळ्याप्रमाणे पटकन होत नाही. त्यामुळे त्याला वेळ लागतो असेही पटवर्धन यांनी सांगितले.

एका मिसाईलला तयार करायला साधारण दहा ते पंधरा दिवस लागते. महिन्यात दोन ते तीन मिसाईल बनतात, ओव्हर नाईट काम झालं तर फारसा फरक पडत  नाही. इस्राईल आणि अमेरिकेच्या मिसाईल लवकर संपतात की इराणच्या लवकर संपतात हे पाहणे महत्वाचे आहे.

रेस्क्यू ऑपरेशन महाकठीण

आधी रेस्क्यू ऑपरेशन आपण विमान पाठवून करत होतो. पण या ठिकाणी तसे आपल्याला करता येणार नाही. मध्यपूर्वेत कुठल्याही प्रकारे आपली विमाने जाऊ शकत नाहीत. कारण तिथे विमानतळच नाही, त्यांना आणण्यासाठी समुद्री मार्गे आणावे लागेल किंवा मग मिडल ईस्ट मधून स्वतःच्या ट्रान्सपोर्टने युरोपमध्ये जाऊन पिकअप करावा लागेल. दोन्ही ठिकाणे आपल्याला आहेत. त्यामुळे काल जी कॅबिनेट सिक्युरिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये तिन्ही सेना दलांना सतर्क राहण्याच्या आदेश देण्यात आलेले आहेत. कारण रेस्क्यु ऑपरेशन होणार आहे, युद्ध सध्या लिमिटेड प्रांतात सुरु आहे. मध्यपूर्वेत राहणाऱ्या भारतीयांवर अजून हल्ले झालेले नाहीत. कारण ते एअरपोर्ट किंवा अमेरिकन बेसच्या जवळपास राहत नाहीत. जे जवळ असतात त्यांना त्रास होईल पण ते किती दिवस तिथे राहू शकतात हा प्रश्नच आहे असेही पटवर्धन यांनी सांगितले.

युद्ध बहुतेक तिघांमध्येच राहिल

अनेक लोक, जे सुट्टीसाठी गेले होते. किंवा पर्यटक होते ते आता येऊ शकत नाहीत. अशा लोकांना कुठून तरी बाहेर काढावे लागेल, याचा विचार करावा लागेल हे युद्ध तिघांमधलं आहे. युद्ध बहुतेक तिघांमध्येच राहिल. त्या पलीकडे जाणार नाही. जर इराणला अमेरिकन बेसेसवर हल्ले करायचे असते तर त्यांनी आतापर्यंत केला असता. तो त्यांनी केला नाही, त्यामुळे इराणला युद्धाची व्याप्ती वाढवायची नाही तर ती तेवढेच ठेवायची आहे असेही निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...