बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास तरुणीचा नकार, आरोपीने तरुणीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने 26 वर्षीय पीडितेवर आरोपीने ज्वलनशील (Rapist attack on woman in mira road) फेकला.

  • रमेश शर्मा, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 7:57 AM, 5 Feb 2020
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास तरुणीचा नकार, आरोपीने तरुणीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला

ठाणे : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने 26 वर्षीय पीडितेवर आरोपीने ज्वलनशील (Rapist attack on woman in mira road) फेकला. ही धक्कादायक घटना मिरारोडच्या काशीमिरा परिसरात घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणी घरी जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत (Rapist attack on woman in mira road) होता. आरोपी मोटरसायकलवरुन आला आणि त्याने पीडितेवर ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यानंतर पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला.

पीडित महिलेच्या तोंडात, डोळ्यात ज्वलनशील पदार्थ गेल्याने तिला किरकोळ दुखापत झाली आहे. सदर महिलेवर भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार करुन तिला घरी सोडले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपीने पीडितेवर ज्वलनशील पदार्थ फेकल्यामुळे तरुणी घाबरली होती. काशीमिरा पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद येथून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

वर्ध्यात शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट शहरातही एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली असून तिच्यावर जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.