कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय?

परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत 300 रुपयांची बाजार भावात वाढ (Onion Rate hike) झाली. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय?
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 7:35 PM

नाशिक : उशिरा झालेल्या पावसाने नवीन लाल कांद्याचं पीक (Onion Rate hike) हे एक ते दीड महिना उशिरा बाजार येणार आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कांदा पिकाचं मोठं नुकसान (Onion Rate hike) झालं. दुसरीकडे मध्य प्रदेश येथील कांदा संपुष्टात आलाय, तर राज्यातील उन्हाळी कांदा 40 टक्के शिल्लक राहिल्याने होलसेल बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यातच परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत 300 रुपयांची बाजार भावात वाढ (Onion Rate hike) झाली. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

होलसेल बाजारात कांदा भाववाढीची कारणे

  • मध्यप्रदेशमध्ये उन्हाळ कांदा संपुष्टात येणे
  • आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील नवीन लाल कांद्याच्या पिकाला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठा फटका
  • राज्यात उशिरा पाऊस झाल्याने नवीन लाल कांद्याचे पीक हे बाजारात एक ते दीड महिना उशिरा येणार
  • मागील वर्षी उन्हाळ कांद्याला 50 ते 100 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाल्याने पुढील नुकसान टाळण्यासाठी आज मिळेल त्या भावाने कांदा विक्री करण्याची घाई
  • परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढली

कांदा हा भारतातील बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सहाजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गरीब असो की श्रीमंत असो, कांदा हा प्रत्येक घरात वापरला जातो. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ (Onion Rate hike) झाली की सरकारला घामच फुटतो. आशिया खंडात अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. तीन हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांचा टप्पा लवकरच पार होणार असल्याने आज उन्हाळ कांद्याच्या बाजार भावात झालेली वाढ ही गृहिणींचे बजेट बिघडवत गृहिणींच्या डोळ्यातून पाणी आणणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. लासलगाव बाजार समितीत 750 वाहनातून 15 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 2811 रुपये, सरासरी 2650 रुपये, तर कमीत कमी 1 हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाला.

भाववाढीचा क्रम (दर – रुपये प्रति क्विंटल)

  • 13 ऑगस्ट – कमीत कमी 800, सरासरी 1435, जास्तीत जास्त 1538
  • 14 ऑगस्ट – कमीत कमी 800, सरासरी 1670, जास्तीत जास्त 760
  • 16 ऑगस्ट – कमीत कमी 800, सरासरी 1870, जास्तीत जास्त 2020
  • 19 ऑगस्ट – कमीत कमी 800, सरासरी 1901, जास्तीत जास्त 2047
  • 20 ऑगस्ट – कमीत कमी 800, सरासरी 2080, जास्तीत जास्त 2372
  • 21 ऑगस्ट – कमीत कमी 900, सरासरी 2351, जास्तीत जास्त 2500
  • 22 ऑगस्ट – कमीत कमी 900, सरासरी 2301, जास्तीत जास्त 2452
  • 23 ऑगस्ट – कमीत कमी 900, सरासरी 2251, जास्तीत जास्त 2395
  • 26 ऑगस्ट – कमीत कमी 100, सरासरी 2381, जास्तीत जास्त 2500
  • 28 ऑगस्ट – कमीत कमी 1500, सरासरी 2650, जास्तीत जास्त 2811

“सरकारने कांदा आयात करुन दर पाडू नये”

”सध्या बाजारात येणारा कांदा हा उन्हाळ कांदा असून हा पाच ते सहा महिने त्याची टिकवण क्षमता असते. शेतकऱ्यांनी हा कांदा मार्च आणि एप्रिल महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटले आहे. नेहमीच ढगाळ वातावरण आणि पावसाच्या अधून-मधून होणाऱ्या सरींमुळे गारवा जास्त दिवस राहिल्यामुळे बराचसा कांदा खराब होत आहे. तसेच मागील वर्षी मातीमोल भावाने कांदा विकावा लागल्यामुळे त्यावेळेची नुकसान आणि आताचा खर्च याची गोळाबेरीज केली तर किमान तीन हजार रुपये कांदा हा विक्री झाल्यानंतरच सर्व खर्च भरून निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार काही मिळत असल्याचा गैरसमज दूर करावा आणि कांद्याचे बाजार भाव पाडण्यासाठी सरकारने कांदा आयात करणे, निर्यातबंदी किंवा निर्यातमूल्य दरात वाढ करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे,” ते मिळू द्यावं, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

कांदा ग्राहकांना मिळेपर्यंत किंमत कशी वाढते?

शेतकऱ्याने लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीला आणला त्या कांद्याला आज 25 ते 28 रुपये असा बाजार भाव मिळाला. हा कांदा दिल्ली, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी किरकोळ विक्रेत्याजवळ विक्रीसाठी पाठवण्यासाठी मजुरी, होणारी नुकसान, वाहतूक खर्च, बाजार बाजार समितीची फी, त्या ठिकाणच्या व्यापाऱ्याची आडत असा किमान 13 रुपये ते 15 रुपये खर्च येतो. हा कांदा किरकोळ व्यापाऱ्यांला 40 रुपये पर्यंत उपलब्ध होत आहे. हा किरकोळ व्यापारी बाजारात अर्धा किलो, एक किलो, दोन किलो अशा पद्धतीने विक्री करतो. त्यामध्ये त्याची होणारी नुकसान, बाजार फी , लागणारे दिवस या सर्व गोष्टी त्या मालावर लावून त्याचा नफा काढत असतो. त्यामुळे मालाची किंमत वाढते.

कांद्याचा गोदाम ते किरकोळ विक्रेता प्रवास

  • बाजार समिती व्यापाऱ्याने लिलावात घेतलेला कांदा हा व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर येण्यासाठी त्याला बाजार समितीची एक टक्का बाजार भावाप्रमाणे फी द्यावी लागते
  • प्रति क्विंटलमागे दोन किलो चढउतार दरम्यान होणारं बाजार भावाप्रमाणे नुकसान
  • कांदा गोदामातून पुढे पाठवण्यासाठी गोणीत कांदा प्रतवारीनुसार भरण्यासाठी मजूर आणि गोणीचा खर्च
  • दिल्ली, मुंबई किंवा पश्चिम बंगाल या ठिकाणी पाठवण्यासाठी अंतराप्रमाणे वाहतूक खर्च 300 ते 550 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे
  • त्या ठिकाणी व्यापाऱ्याची बाजार भावाप्रमाणे अडत 6 टक्के
  • संबधित व्यापाऱ्याच्या गोडाऊनवरील मजुराची मजुरी आणि चढउतार दरम्यानचं नुकसान

प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला कांदा शेतातून ग्राहकाच्या हातात येईपर्यंत मोठा प्रवास करतो. यात घाम गाळून कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या नफ्यापेक्षा इतर खर्चच जास्त आहे. एरवी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने, अक्षरशः पिकवण्यासाठी लागलेल्या खर्चापेक्षाही कमी दरात कांदा विकावा लागतो. आता दर वाढून किमान गेल्या वर्षी झालेलं नुकसान भरुन निघण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारने किमान यावेळी तरी दर पाडण्याचे प्रयत्न करु नयेत एवढीच शेतकऱ्यांची इच्छा आहे.

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.