रेल्वेमध्ये दोन लांखापेक्षा अधिक जागांसाठी भरती

रेल्वेमध्ये दोन लांखापेक्षा अधिक जागांसाठी भरती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी एक लाखांपेक्षा अधिक पदांवर भरती काढली होती. मात्र यावेळी भारतीय रेल्वे दोन लाखांपेक्षा अधिक पदावर भरती काढण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच याबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये दोन लाख 30 हजार पदांसाठी भरती काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सरकारने लोकसभेत 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू केल्यानंतर या भरतीची घोषणा केली.

रेल्वे मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकार आरक्षणाच्या नियमानुसार या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात करणार आहे. या दोन्ही टप्प्यांची वेळ आणि पदांची संख्या वेगळी आहे.

पहिला टप्पा

पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 31 हजार 428 पदांचा समावेश असेल. यामध्ये निवड प्रक्रियेद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

दुसरा टप्पा

दुसरा टप्पा मे-जून 2020 ते जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण होईल. या टप्प्यात 99 हजार पदांचा समावेश असेल. एससीसाठी 34 हजार, एसटीसाठी 17 हजार आणि ओबीसीसाठी 62 हजार पदं आरक्षित आहेत. तसेच यामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या सामान्य वर्गासाठी 23 हजार जागा आरक्षित आहेत.

भारतीय रेल्वे नवीन योजनांसाठी आवश्यक कर्माचारी आणि रेल्वे नेटवर्कची दक्षता वाढवण्यासाठी आपली कर्मचारी संख्या वाढवत आहे. कर्मचारी संख्या वाढल्यावर कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम काम करावा लागणार नाही, तसेच इतर प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. भारतीय रेल्वेमध्ये एकूण 15,06,598 पदं आहेत. यामध्ये 12,23,622 कर्मचारी कार्यरत आहेत आणि 2,82,976 पदं अजून खाली आहेत. सध्या 1,51,548 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. मात्र 1,31,428 पदं अजूनही खाली आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रेल्वेमध्ये एकूण 1,31,428 पदं खाली असतील आणि यामुळे पुढील दोन वर्षात अंदाजे 2,30,000 पदं खाली होणार आहेत.

कोण करु शकतात अर्ज

या भरती प्रक्रियेमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.

Published On - 8:38 pm, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI