Riteish Deshmukh | आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते, रितेश देशमुखची खास दिवाळी

नेहमीप्रमाणे दिवाळीच्या दिवशीही बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Riteish Deshmukh | आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते, रितेश देशमुखची खास दिवाळी
Harshada Bhirvandekar

|

Nov 14, 2020 | 3:13 PM

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवुड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. बॉलिवूडकर या निमित्ताने आपले फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. नेहमीप्रमाणे दिवाळीच्या दिवशीही बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश नेहमीच एका अनोख्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा देत असतो. दिवाळी निमित्तानेही त्याने असाच एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता-पायजामा परिधान (Diwali Dress) केलेला दिसत आहे. विशेष म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केले गेले आहेत (Riteish deshmukh’s new dress for Diwali made from his mother’s old saree).

स्वतः रितेशने यासंदर्भात माहिती दिली आहे. दिवाळीनिमित्त रितेश देशमुख यांने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशची आई हवेत साडी झटकताना दिसत आहे. तर, काही सेकंदात रितेश देशमुख आणि त्याची दोन्ही मुले एकाच रंगाचे कपडे घालून दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

“आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा”, असे कॅप्शन देत रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला काही वेळातच लाखो व्ह्युव्ज मिळाले आहेत.

चाहत्यांसह कलाकारांच्या प्रतिक्रिया

रितेश देशमुखच्या या खास पेहरावाला चाहत्यांकडून कौतुकाची पावती मिळत आहेत. खरोखरच रितेशच्या या दिवाळी स्पेशल पेहरावात ‘मायेची ऊब’ आहे. रितेशच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख चित्रपटांप्रमाणेच, त्याच्या खास शैलीने प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकतो. अलीकडेच रितेशने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमामध्ये पत्नी जेनेलियासोबत हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. (Riteish deshmukh’s new dress for Diwali made from his mother’s old saree).

(Riteish deshmukh’s new dress for Diwali made from his mother’s old saree)

काही दिवसांपूर्वी रितेश आणि जेनेलियाने एका व्हिडीओ शेअर करत, अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याचे चाहत्यांसोबत शेअर केले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर रितेश देशमुख शेवटचा ‘बागी 3’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

(Riteish deshmukh’s new dress for Diwali made from his mother’s old saree)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें