महिलेच्या नेतृत्वातील रोहिंग्या संघटना भारतावर हल्ल्याच्या तयारीत!, झाकीर नाईकशीही संबंध

| Updated on: Dec 13, 2020 | 10:52 AM

मलेशियातील रोहिंग्या संघटन भारतात हल्ला करण्याच्या विचारात आहे, अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे. हा हल्ला एका महिलेल्या खांद्यावर जबाबदारी असलेल्या संघटनेकडे आहे.

महिलेच्या नेतृत्वातील रोहिंग्या संघटना भारतावर हल्ल्याच्या तयारीत!, झाकीर नाईकशीही संबंध
Follow us on

नवी दिल्ली: मलेशियातील एक रोहिंग्यांची संघटना भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही आर्थिक व्यवहारातून याची माहिती मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे आर्थिक व्यवहार विवादित इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक यांच्याशी निगडीत आहेत. हा हल्ला करण्याची जबाबदारी एका महिलेच्या खांद्यावर असल्याचं बोललं जात आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.(Rohingya organizations affiliated with Zakir Naik prepare to attack India)

मलेशियातील रोहिंग्या संघटन भारतात हल्ला करण्याच्या विचारात आहे, अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे. हा हल्ला एका महिलेल्या खांद्यावर जबाबदारी असलेल्या संघटनेकडे आहे. या संघटनेचं प्रशिक्षण म्यानमारमध्ये झालं आणि येत्या काही दिवसांत भारतातील एखाद्या शहरात हल्ला करण्याचं त्यांचं नियोजन होतं, अशी माहिती मिळत आहे.

राज्यांना सतर्कतेचा इशारा

गुप्तचर विभागाकडून आधीपासूनच पोलिस आणि दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या गुप्तचर विभागाला माहिती दिली होती. त्यानंतर राज्यांची यंत्रणा अलर्टवर होती. रोहिंग्यांच्या या संघटनेची माहिती एका आर्थिक व्यवहारातून समोर आली आहे. 2 लाख डॉलरच्या जवळपास पैसा क्वालालांपूरचे रोहिंग्या नेते मोहम्मद नासीर आणि झाकीर नाईक यांच्याशी निगडीत असल्याचं दिसून आलं आहे. चेन्नईच्या संशयीत हवाला डीलरने त्याचा हिस्सा आल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

अयोध्या, बोधगया निशाण्यावर?

एक दहशतवादी संघटना डिसेंबरमध्ये बांग्लादेशमार्गे भारतात घुसण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करणारी महिला नेता कोण, याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही. मात्र, संबंधित महिला ही गेल्या वर्षी प्रशिक्षणासाठी म्यानमारला गेल्याचंही कळतंय. अयोध्या, बोधगया, पंजाब किंवा श्रीनगरला निशाणा बनवायची तयारी होती. महत्वाची बाब म्हणजे पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया त्यांची मदत करत असल्याचंही समजतंय.

संबंधित बातम्या:

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!

15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याची शक्यता, मुंबईसह देशभरात हायअलर्ट!

Rohingya organizations affiliated with Zakir Naik prepare to attack India