AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याची शक्यता, मुंबईसह देशभरात हायअलर्ट!

मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी (Independence day) दहशतवादी हल्ला (Terrorist attack) होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे.

15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याची शक्यता, मुंबईसह देशभरात हायअलर्ट!
Maharashtra Police Bharti 2019
| Updated on: Aug 11, 2019 | 10:22 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत कलम 370 हटवल्याने जम्मू काश्मीरचा विशेषाधिकारी काढून टाकला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी (Independence day) दहशतवादी हल्ला (Terrorist attack) होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत (Police) करण्यात आली आहे.

येत्या आठवड्यात 12 ऑगस्टला बकरी ईद आणि त्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असे दोन मोठे सण आहेत. याच पार्श्वभूमीवर हा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशातील 15 मोठ्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कलम 370 हटवल्याने काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे ही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा  दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी व सर्व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर आहेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.