ऐन युद्धकाळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती बिघडली, कॅन्सर आणि पार्किन्सन सारख्या आजरांशी देतायेत लढा, लवकरच होणार ऑपरेशन

ऑपरेशनच्या काळात केवळ दोन ते तीन दिवसांसाठी युद्धाची कमान पुतिन निकोलाई यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.

ऐन युद्धकाळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती बिघडली, कॅन्सर आणि पार्किन्सन सारख्या आजरांशी देतायेत लढा, लवकरच होणार ऑपरेशन
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 7:08 PM

मॉस्को– युक्रेन आणि रशियाच्या युद्धकाळात (Russia-Ukraine war) एक मोठी बातमी समोर येते आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांच्यावर लवकरच कॅन्सरची सर्जरी होण्याची शक्यता आहे. डेली मेलच्या माहितीनुसार, पुतिन यांना पोटाचा कॅन्सर आहे. त्यांच्यावर उपचाराची पूर्ण तयारीही करण्यात आली आहे. पुतिन लवकरच या युद्धाची कमान सिक्युरिटी कौन्सिल आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस चे माजी प्रमुख निकोलई पुत्रशेव यांच्याकडे सोपवण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. पुतिन युद्धाच्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी पुत्रशेव ( Nikolai Patrushev)यांच्याकडे सोपावणार असल्याची माहिती आहे. पुतिन यांना १८ महिन्यांपूर्वी कॅन्सर आणि पार्किंसनचा आजार झाल्याची माहिती रशियन माध्यमांनी क्रेमलिन अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र पुतिन यांची प्रकृती उत्तम असल्याचा दावाही हे अधिकारी करीत आहेत. रशियन माध्यमांनी दावा केला आहे की- क्रेमलिनच्या संरक्षण दलाच्या मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पुतिन हे सध्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीतून जात आहेत. या काळात त्यांचे ऑपरेशन होण्याची गरज आहे. मात्र अद्याप या ऑपरेशनची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

निकोलाई यांच्याकडे कमान सोपवणे घटनाबाह्य

या सगळ्या परिस्थितीतही पुतिन थोड्या काळासाठीही सत्ता इतरांच्या हातात देण्यास तयार नाहीत. मात्र ऑपरेशनच्या काळात केवळ दोन ते तीन दिवसांसाठी युद्धाची कमान पुतिन निकोलाई यांच्याकडे देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पुतिन यांचे हे पाऊन घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात येतेय. घटनेनुसार, राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व निर्णयांचे अधिकार हे पंतप्रधान मिखाईल मुशुस्तीन यांना द्यायला हवेत.

औषधांमुळे पुतिन यांना अशक्तपणा

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर जी औषधे पुतिन यांना देत आहेत, त्यामुळे पुतिन यांना चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्य़ा अडचणींना सामोरे जावे लागते आहे. पुतिन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना यानंतर हटविण्यातही आले. तर दुसरीकडे पुतिन यांना थेरॉईड कॅन्सर झाल्याचीही चर्चा आहे. ज्याच्यावर सातत्याने उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते आहे.

फोटोंमध्ये पुतिन दिसतायेत अशक्त

रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांच्यासोबत चर्चेच्या आलेल्या एका छायाचित्रात पुतिन यांच्या चेहऱ्यावर सूज आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्याचबरोबर त्यांनी चक्कर येण्याचे टाळण्यासाठी टेबल घट्ट पकडून ठेवल्याचेही दिसते आहे. एका दुसऱ्या व्हिडिओत पुतिन यांच्या शरिरात कंप जाणवत असून ते त्याच्यावर मात करताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.