अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचं निधन

'आम्ही तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहू' अशा शब्दात सलमानने भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Salman Khan Nephew Death)

अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचं निधन
| Updated on: Mar 31, 2020 | 11:10 AM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या कुटुंबासाठी एक दु:खद बातमी आहे. सलमानचा पुतण्या अब्दुल्ला खान याचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. (Salman Khan Nephew Death)

हृदयाशी संबंधित आजारामुळे अब्दुल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी अब्दुल्लावर काळाने घाला घातला. अब्दुल्लाच्या मृत्यूबद्दल सलमानने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. ‘आम्ही तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहू’ अशा शब्दात सलमानने भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अब्दुल्ला याला मधुमेहाचा त्रास झाला. दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलमानला त्याच्या तब्येतीची माहिती मिळाली, तेव्हा त्याने लाडक्या पुतण्याला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात हलवले.

हेही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये ड्युटी

अब्दुल्लाचा मृत्यू कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे झाल्याच्या अफवा उठल्या होत्या, परंतु खान कुटुंबाने त्या नाकारल्या असून त्याचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं स्पष्ट केलं आहे. (Salman Khan Nephew Death)

अब्दुल्ला बॉलिवूडशी निगडीत नव्हता, मात्र सोशल मीडियावर सलमान खानने पोस्ट केलेल्या असंख्य फोटो आणि व्हिडिओंमध्ये तो बर्‍याचदा दिसला.

गेल्या वर्षी जूनमध्ये सलमान खानने अब्दुल्लासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ‘बजरंगी भाईजान’ भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या अब्दुल्लाला खांद्यावर उचलताना दिसला होता.