माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना रुग्णांसाठी 'या' अभिनेत्याकडून मदतीचा हात

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा (Kamal Hasan tweet on corona) केली.

माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना रुग्णांसाठी 'या' अभिनेत्याकडून मदतीचा हात

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा (Kamal Hasan tweet on corona) केली. मोदींच्या घोषणेनंतर अनेक दिग्गजांनी याला पाठिंबा दिला. तर देशातील नागरिकांनीही लॉकडाऊनचे समर्थन करत घरात राहण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊन दरम्यान अनेक बॉलिवडू कलाकारांनी सरकाराला मदत केली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेता कमल हासन यांनीही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, असं सांगितले. त्यामुळे सध्या कमल हानस यांचे सर्वच स्तरातून कौतुक (Kamal Hasan tweet on corona) केले जात आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. तसेच रुग्णांसाठी जागा कमी पडू नये म्हणून रेल्वेतही कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वे डब्यांचे रुग्णालयात रुपांतर केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कमल हासन यांनीही ट्वीट करत माझ्या घरचे रुग्णालयात रुपांतर करा, असे सांगितले.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. प्रत्येकजण मदतीसाठी पुढे धावून येत आहे. अशातच कमल हासन यांनी थेट त्यांचे घर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी देत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत त्यांच्या ट्वीटवरही अनेकांना कॉमेंट आणि लाईक केले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 220 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर देशात एक हजार पेक्षा अधिकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *